अहमदनगर प्रतिनिधी (दि.८ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द वेगवेगळ्या दोन ठिकाणी कारवाई करुन एकूण 7,50,000/- रु.(सात लाख पन्नास हजार) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनक मुंडे, सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, बापुसाहेब फोलाणे,पोना/शंकर चौधरी,विशाल दळवी, भिमराज खर्से,लक्ष्मण खोकले,पोकॉ/रणजीत जाधव,विनोद मासाळकर व उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकाने राहुरी पोलीस स्टेशन हद्यीत कारवाई करुन अवैधरित्या वाळु चोरी व वाहतुक करणारे 02 ठिकाणी छापे टाकुन एकुण 7,50,000/- रुपये किंमतीचे एक निळे रंगाचा ट्रॅक्टर, ट्रॅक्टरची यादी व केनी तसेच एक विटकरी रंगाचा टेम्पो असा मुद्देमाल जप्त करुन खालील प्रमाणे 03 आरोपीं विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन येथे भादविक व पर्यावरण कायदा कलमान्वये एकुण-2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम आरोपीचे नाव व पत्ता जप्त मुद्देमाल
1)राहुरी 126/2023 भादविक 379, 34 सह पकाक. 3/15 1. शशिकांत उध्दव बर्डे,वय 34, रा. बारागांव नांदुर,ता.राहुरी 4,50,000/- एक निळे रंगाचा ट्रॅक्टर व ट्रॅक्टरची यादी व केनी
2)राहुरी 144/2023 भादविक 379 सह पकाक. 3/15 2. महेश वराळे रा. मल्हारवाडी रोड, ता. राहुरी 3,00,000/- विटकरी रंगाचा टेम्पो एकुण 02 आरोपी 7,50,000/- एक निळे रंगाचा ट्रॅक्टर व ट्रॅक्टरची यादी व केनी व विटकरी रंगाचा टेम्पो,सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर,श्री. संदीप मिटके,उपविभागीय पोलीस अधीकारी,श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

