अहमदनगर प्रतिनिधी (दि.८ फेब्रुवारी):- ▶️ *युनिट* अहमदनगर
▶️ *तक्रारदार-* महिला, वय-२६ रा.राहुरी, ता- राहुरी, जि.अहमदनगर
▶️ **आरोपी* =डॉ.वृषाली तुळशीराम सूर्यवंशी-कोरडे, वय- ३९ वर्ष.वैद्यकिय अधिकारी,वर्ग २(गट अ) प्राथमिक आरोग्य केंद्र, बारागांव नांदूर,ता- राहुरी , जिल्हा- अहमदनगर.
▶️ *लाचेची मागणी/-* १०,०००/-₹
▶️ *लाच स्विकारली* * – १०,०००/₹
▶️ *हस्तगत रक्कम-* १०,०००/-रु
▶️ *लाचेची मागणी -* ता.०६/०२/२०२३
▶️ *लाच स्विकारली* -ता. ०८/०२/२०२३
▶️ *लाचेचे कारण* -.यातील तक्रारदार या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस असुन,त्यांचा माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ या दोन महिन्यांचा कामावर आधारित मोबदला व प्रोत्साहन भत्ता व आक्टोबर महिन्याचा प्रोत्साहन भत्ता मिळणे करिता तक्रारदार यांनी यातील लोकसेविका यांची दोन महिन्यांपूर्वी भेट घेऊन विचारणा केली असता, त्यांनी तुला मिळणारे रक्कमेच्या निम्मी रक्कम द्यावी लागेल असे सांगितले. त्यानंतर मागील एक महिन्यापूर्वी तक्रारदार या पुन्हा आरोपी लोकसेविका यांना भेटल्या असता त्यांनी आता काहीतरी रक्कम दे तरच मी तुझे बिलासंबधी पुढील प्रोसेस करेन असे सांगितलेने तक्रारदार यांनी नाईलाजाने जवळ असलेले ₹ ४५००/- त्यांना दिले.त्यानंतर दिनांक ०३/०२/२३ रोजी तक्रारदार यांनी पुन्हा आरोपी लोकसेविका यांची भेट घेऊन बिलासंदर्भात विचारणा केली असता पुन्हा बिलाचे निम्मे रकमेची मागणी केली व तडजोड अंती ₹ १०,०००/ तरी द्यावे लागतील असे सांगितले.तक्रारदार यांना आरोपी लोकसेविका यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला. दिनांक ०६/०२/२३ रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी लोकसेविका यांनी तक्रारदार यांचे कडे ₹ १०,०००/-मागणी केल्याचे निष्पन्न झाले.त्यावरून आज रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बारागांव नांदूर येथे लाचेचा सापळा आयोजित केला असता,आरोपी लोकसेविका यांनी त्यांचे केबीन मध्ये तक्रारदार यांचे कडुन ₹ १०,००० लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत
▶️ *सापळा अधिकारी* =
हरिष खेडकर,पोलीस उपअधीक्षक ला.प्र. वि. अहमदनगर.
▶️ *सापळा पथक* – पोलीस अंमलदार रविंद्र निमसे,वैभव पांढरे, बाबासाहेब कराड,महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, चालक पोलीस हवालदार हरुन शेख
▶ **मार्गदर्शक* -*मा शर्मिष्ठा वालावलकर – घारगे मॅडम,पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र, नाशिक,श्री नारायण न्हाहळदे अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र, नाशिक
३) मा.नरेंद्र पवार वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक.
▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी* मा.प्रधान सचिव १, सार्वजनिक आरोग्य विभाग,जी.टी.हॉस्पिटल, मुंबई
