नायगावात शाळांची बालदिंडी उत्साहात..अवतरली पंढरी
नाऊर (वार्ताहर):-तालुक्यातील नायगाव येथील जुने नायगाव प्राथमिक शाळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक विद्यालय या दोन्ही शाळांच्या एकत्रित बालदिंडीने अवघे नायगाव दुमदुमून गेले.शाळेतील बालवारकऱ्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला.यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल,रुक्मिणी,वारकरी अशी विविध वेशभूषा करून हाती टाळ,वीणा,डोक्यावर तुळस,हातात भगवी पताका घेऊन विठ्ठलाच्या नामात गुंग होऊन गेले होते.
विद्यार्थी,शिक्षक व ग्रामस्थ यांनी दिंडीत पावली व फुगडीचाही आनंद लुटला.यावेळी निलेश लांडे,किरणकुमार लांडे,महेश राशिनकर,किरण दातीर,अनिल लांडे,सुरेश भारसाकळ,भानुदास शंकर लांडे,भानुदास संताजी लांडे यांनी विद्यार्थ्यांना चहा,बिस्किटे,केळी,फरसाण आदी अल्पोपहार दिला.यावेळी चंद्रहंस लांडे,वसंत लांडे,पोलिस पाटील राजेंद्र राशिनकर,सरपंच राजाराम राशिनकर,नंदा दातीर,सुकदेव तुपे यांनी अभंग गायले.तसेच संदिप धसाळ,पूजा लांडे,अरुणा लांडे आदींनी दिंडी सोहळ्यासाठी मदत केली.
यावेळी जुने नायगावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापक लहानू लबडे,संतोष वाघमोडे,सुजाता सोळसे,राजेंद्र पंडित,फारुक इनामदार,बाबासाहेब मुन्तोडे,शाम मोरे,मच्छिंद फणसे,अंगणवाडी सेविका हिराबाई त्रिभुवन,मनिषा राशिनकर ताई आदींनी परिश्रम घेतले.