अँन्टी करप्शन ब्युरोची कारवाई..तलाठी 25 हजार घेताना जाळ्यात
अहिल्यानगर प्रतिनिधी
▶️ *युनिट – * अहिल्यानगर*
▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय 39, अहिल्यानगर
▶️ *आलोसे-* संतोष बाबासाहेब शेलार, वय 40वर्षे, व्यवसाय तलाठी, कनोली , *(वर्ग-3)*, ता. संगमनेर,जि. अहिल्यानगर
▶️ *लाचेची मागणी-*
30000/-
तडजोडंती- 25000/-
▶️ *लाच स्वीकारली-*
25000/-
▶️ * *लाचेचे कारण**. यातील तक्रारदार यांच्या ग्रामपंचायत शिवारात प्रधानमंत्री आवास योजना,रमाई आवास योजना व शबरी आवास योजने अंतर्गत मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार मोफत पाच ब्रास वाळू वाटप सुरू करण्यात आलेली आहे .सदर वाळू वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर वाळू वाहतुकीसाठी यातील तक्रारदार व त्यांचे मित्र तसेच इतर वाहने यांना मा. तहसीलदार संगमनेर यांनी मंजुरी दिलेली आहे.तक्रारदार व त्यांचे मित्र हे त्यांच्या ट्रॅक्टर द्वारे वाळू वाहतूक करण्याचे कामकाज करीत असताना वर नमूद आलोसे यांनी तक्रारदार व त्यांचे मित्र तसेच इतर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना अगर तुम्हाला वाळू वाहतूक करायची असेल तर मला तीस हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा तुमच्यावर अवैद्यरित्या वाळू वाहतूक करीत असल्याबाबत कारवाई करेल सदरची कारवाई टाळायची असेल तर तीस हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून लाचेची मागणी करीत असल्याबाबत दि.07/07/2025 रोजी तक्रार प्राप्त झाली होती. त्या प्रमाणे दिनांक 07/07/ 25 रोजी पडताळणी केली असता आलोसे यांनी दोन पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडअंति 25000/- लाचेची मागणी केली आहे तसेच आज दिनांक 07/07/ 2025 रोजी सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडून आलोसे यांनी पंचा समक्ष 25000/-रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात मिळून आले आहेत.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून संगमनेर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
▶️ *सापळा व तपास अधिकारी*,
पोलीस निरीक्षक छाया देवरे लाप्रवी अहिल्यानगर
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी*-
पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे,ला.प्र.वि. अहिल्यानगर
▶️ *सापळा पथक*
1) चालक पोहवा हरून शेख
3)पोना चंद्रकांत काळे
4) *पोकॉ गजानन गायकवाड
5) पोकॉ सचिन सुद्रुक
▶️ *मार्गदर्शक-
*1) मा. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक*
2) *मा. माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक*,
ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी*
मा जिल्हाधिकारी अहिल्यानगर
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगर तहसील कार्यालय सावेडी अहिल्यानगर