डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरणाची रणनीती बैठक..10 जुलैला सर्व समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गेली अनेक वर्षापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली असून ही मागणी मान्य झाली व जुन्या पुतळ्याशेजारी नवीन पुतळा उभारण्यासाठी सुशोभीकरण करण्यात आले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा देखील बसवण्यात आला मात्र अद्यापही पुतळ्याचे अनावरण करण्यात आले नाही.
संपूर्ण आंबेडकरी अनुयायी यांनी एक दिलाने गुरुवारी दि. 10 जुलै रोजी शासकीय विश्रामगृह येथे सकाळीं 11 वाजता समाजबांधवांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याची रणनीती आखण्यात येणार असून या बैठकीत आंबेडकरी अनुयायी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.