जन्माला येणाऱ्या बाळांना आता तात्काळ मिळणार जन्म दाखले जिल्हा रुग्णालयाचा उपक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाने एक नवीन उपक्रम हाती घेतला असून नवीन जन्माला येणाऱ्या बाळांचे जन्म दाखले या उपक्रमामुळे तात्काळ दाखले मिळणार आहेत.जन्म दाखले काढण्यासाठी नातेवाईकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.वेळेवर जन्म दाखले न मिळाल्यामुळे नातेवाईकांना याचा खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
परंतु आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे यांच्या संकल्पनेतून आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार डिलिवरी रुग्णास रुग्णालयातून घरी सोडताना जन्म दाखला देण्याची सुरुवात जिल्हा शल्यचिकित्सक यांचे हस्ते करण्यात आली. त्यामुळे नातेवाईकांची पुन्हा पुन्हा येऊन होणारी अडचण दूर होण्यास मदत होईल.
यासाठी डॉ.निलेश गायकवाड,अधिसेविका लोंढे मॅडम,हर्षल गायकवाड,सुरेखा आंधळे यांचे विशेष सहकार्य लाभले.नवीन जन्म झालेल्या बाळांना तात्काळ जन्म दाखले मिळत असल्यामुळे नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा रुग्णालयाचे आभार मानले आहेत.
