आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मारकासाठी निधी द्या-आअमोल खताळ..संगमनेरच्या सांस्कृतिक समृद्ध वारसा निर्माण करणाऱ्या कलावंतांच्या स्मारकाची मागणी विधानसभेत
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी मराठी भाषेचे मोठेपण जगात वाढवण्याचे कार्य अनेक महान धुरंदर व्यक्तींनी केले आहे.त्यामध्ये अनेक संत, समाज सुधारक,लेखक, साहित्यिक,कलावंत,विचारवंत,पत्रकार यांच्या सह इतरांचे मोठे योगदान लाभले आहे.अशाप्रकारे मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संगमनेरच्या महान कलावंत आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर,कवी अनंत फंदी,शाहीर विठ्ठल उमप,तमाशा कलावंत कांताबाई सातारकर,गुलाबबाई संगमनेरकर यांचे महाराष्ट्राच्या कला सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे.

तालुक्यातील हिवरगाव पावसा हे पवळा भालेराव यांचे जन्मगाव आहे इथुन पवळा यांचा प्रवास सुरू झाला आणि तो मुंबईत थांबला.त्यांच्या जन्मगावी प्रेरणादायी स्मारकाची मागणी दीर्घकाळापासून शासनाकडे केली जात आहे.आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रस्ताव दीर्घकाळापासून मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव प्रलंबित आहे.या प्रश्नावर शासनाचे लक्षवेधत नामचंद पवळा भालेराव यांच्या राष्ट्रीय स्मारक व लोककला प्रशिक्षण केंद्रासह संगमनेरच्या महान कलावंतांच्या स्मारकास निधी देण्याचे मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत केली आहे.
कला सम्राज्ञी पवळा कला मंच हिवरगाव पावसा या संस्थे मार्फत अनेक वर्षांपासून नामचंद पवळा भालेराव यांच्या राष्ट्रीय स्मारक प्रस्ताव सादर केला आहे. वेळोवेळी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला जात आहे.परंतु शासन दरबारी नामचंद पवळा यांची उपेक्षा करण्यात आली. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या पाठपुराव्या मुळे सदरचा प्रस्ताव ग्राम विकास विभागाने मंजुरी साठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे.सदरचा जानेवारी 2023 पासून सदरचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात मंजुरी साठी प्रलंबित आहे.परंतु पावसाळी अधिवेशनात नामचंद पवळा भालेराव यांचे राष्ट्रीय स्मारक व लोककला प्रशिक्षण केंद्रासह संगमनेरच्या महान कलावंतांच्या स्मारकास निधी देण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत केली. त्यामुळे नामचंद पवळा राष्ट्रीय स्मारक व लोककला प्रशिक्षण केंद्राचे स्वप्न पूर्णत्वास जाईल असा आशेचा किरण तयार झाला आहे.नामचंद पवळा भालेराव यांच्या राष्ट्रीय स्मारक व लोककला प्रशिक्षण केंद्र तसेच कवी अनंत फंदी,शाहीर विठ्ठल उमप,तमाशा कलावंत कांताबाई सातारकर,गुलाबबाई संगमनेरकर यांचे स्मारक निर्मिती साठी शासनाने भरीव निधी दिल्यास सांस्कृतिक वैभवात भर पडेल.तसेच या महान धुरंधर कलावंतांचा इतिहास भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहिल आणि कला,सांस्कृतिक चळवळीला पाठबळ मिळेल.अशी अपेक्षा कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव आणि नामचंद पवळा यांचे पणतू संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी व्यक्त केली.
नामचंद पवळा भालेराव यांच्या राष्ट्रीय स्मारक व लोककला प्रशिक्षण केंद्र तसेच कवी अनंत फंदी,शाहीर विठ्ठल उमप,तमाशा कलावंत कांताबाई सातारकर,गुलाबबाई संगमनेरकर यांच्या स्मारकाचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्या बद्दल हिवरगाव पावसा गावचे सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार,शिवसेना मागासवर्गीय सेल जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव,ओजस्वी भारत फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष उत्तम जाधव,सरपंच सेवा संघाचे नेते बाबासाहेब पावसे,वृक्षमित्र गणपत पावसे, विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटीचे संचालक अशोक भालेराव,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यादवराव पावसे,डी.के.गायकवाड,पत्रकार अरुण खरात,महेश भोसले,अर्जुन मुन्नतोडे,भाऊसाहेब निळे, भीमाशंकर पावसे,बाळासाहेब भालेराव,संजय भालेराव,मान्सूर इनामदार, यादव भालेराव,बच्चन भालेराव,सुयोग भालेराव यांच्या सह हिवरगाव पावसा ग्रामस्थांकडून आमदार अमोल खताळ यांचे कौतुक होत आहे.तसेच संगमनेर सह राज्यातील सर्व कलाप्रेमी नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.