बारावीच्या परीक्षेत विशेष गुण संपादन करून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार सोहळा संपन्न..प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करणार शहराध्यक्ष अतुल भोसले
विरार प्रतिनिधी (मनीषा जाधव):-प्रहार जनशक्ती पक्षाचे विरार शहर अध्यक्ष श्री.अतुल सावंत भोसले आणि विद्यार्थी संघटनेचे विरार शहरअध्यक्ष श्री.कमलेश सिंग यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने विरार शहरातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष गुण संपादन करून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सत्कार सोहळ्याने विद्यार्थी भारावून गेले व पुढील अभ्यासक्रमात यापेक्षाही जास्त गुण मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार असे विद्यार्थ्यांनी यावेळेस सांगितले.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे विरार शहर अध्यक्ष अतुल सावंत भोसले म्हणाले की,दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रामाणिकपणाने प्रयत्न केला जाणार असल्याचे अतुल सावंत भोसले यांनी सांगितले.
या सोहळ्यास प्राध्यापक डॉ.वैभव अवस्थी (बी.एच.एम.एस/एल.एल.बी) आणि प्रा.श्री.श्रीकांत जाधव (एम.बी.ए/एल.एल.बी) या मान्यवरांनी विद्यार्थी आणि पालकवर्गाला मोलाचे मार्गदर्शन केले.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
