*🙏🚩कैवारी जगाचा पांडुरंग माझा🙏* 🚩
हे देवा पांडुरंगा. राजा पंढरीचा.
आणि …माझ्या वेड्या भाबड्या मनाचाच नाही तर अशा अनेक लाखो भक्तांचा, महाराष्ट्राचा श्वास म्हणजे माझी विठू माऊली,…
महाराष्ट्र रंजले गांजले यांची भूमी आहे, या भूमीत अनेक साधुसंत महंत राजे , मावळे, क्रांतिवीर, विरांगणा महापुरुष यांनी जन्म घेतला, ही महाराष्ट्र भूमी एक पावन प्रेमळ भूमी . म्हणजे महाराष्ट्र प्रदेश… राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रदेश…
महाराष्ट्रात अनेक लेण्या, किल्ले,जागृत व सुरेख देवस्थान आहेत त्यातून पंढरपूर हे आपल्या देशात नाहीतर साऱ्या जगात प्रसिद्ध असलेले देवस्थान म्हणजेच पंढरपूर माझ्या विठू माऊलीचा देवस्थान … भव्यदिव्य विठ्ठल रुक्माई चे मंदिर ..
दरवर्षी आषाढी एकादशी व कार्तिक एकादशीला लाखो भाविकांची गर्दी
पंढरपुराव मावत नाही . साऱ्या भक्तांनी पंढरपूर दुमदुमते साधू संत महंत शेतकरी योगी … साऱ्या पंढरपुरात टाळ मृदुंगाचा नाचण्या गाण्याचा सर्वेकडे जल्लोष बघायला मिळतो , जणू काही स्वर्गाचा आनंद मिळल्यासारखं वाटतं. मन अगदी आनंदाने हर्षाने भारावून जातं अशी माझ्या विठू माऊली ची पंढरी . सर्व महाराष्ट्राचा पालनहरी माझा विठूराया माझा हरी., निवृत्ती महाराज ,ज्ञानेश्वर महाराज, माता मुक्ताई, सोपान काका, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, जिजाबाई, गाडगे महाराज ,गजानन महाराज अशा अनेक लांब लांबूने पंढरी महाराजांच्या भेटीसाठी सर्व संतांच्या पालख्या वारकरी , दिंडी खूप कोसो दुरून दुरून चालत आपले महाराष्ट्राचे दैवत
आपली माय रुक्माई व आपला बा .पांडुरंग विठ्ठला यांच्या भेटीसाठी पंढरपुरात येतात. हे भक्त हे सर्व वारकरी गावागावात थांबून आपल्या भक्तीचा भक्तिसार आपली संस्कृती आपली अस्था जपत. आपल्या पांडुरंगाच्या गुणांचा सार वाटत. भजन कीर्तन गवळणी गाणी विठ्ठलाच्या जयघोषाने पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, अशा जयघोषाने आपली वारी पुढे चालवत असतात . *घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा अशा दारिद्र्याचा* *व्हावा नायनाट*
*पाऊले चालती पंढरीची वाट* ..आपली वआपल्यासोबत आलेले सर्व भक्त एकमेकांची काळजी घेत आनंदाने मोठ्या जल्लोषाने हर्षाने आपली माय रुक्माई व आपला कैवारी बाविठोबा महाराज राजा पंढरीचा यांच्या भेटीच्या उल्हासाने धावत चालतात , आणि माझा पंढरपुराचा राजा माझा बाप विठोबा माझा पांडुरंगा जणू साऱ्या भक्तांची आतुरतेने कटेवरती हात ठेवून वाट बघत असतो…
माझ्या पंढरीच्या कैवारीची अशी ख्याती आहे असे म्हणतात की पंढरपुरात जे वारकरी जे भक्त मोठ्या मोठ्या रांगेत उभे राहतात जे त्यांना कष्ट होते दुःख होते तर माझा पंढरीचा कैवारी बघवत नाही ते दुःख माझ्या माऊलीला सहन होत नाही म्हणून म्हणतात की पंढरपुरात मंदिरात रात्री भक्तांच्या पायाची माती जमा करून ती चाळून तिच्यात चंद्रभागेचं पाणी मिसळून जो पांडुरंगाला टिळा लावला जातो त्या पिवळ्या टिळामध्ये एक काळा टिळा असतो तोच हा टिळा असा माझा कैवारी विठूराया माझी माऊली,
*विठु माझा लेकुरवाळा संगे चाले भक्तांचा मेळा …*
श्रीकृष्ण भगवान चे रूप अर्थातच विठूराया पांडुरंग महाराज पंढरीचा राजा … जेव्हा द्वारकेत रुक्मिणी माता श्रीकृष्ण भगवाना वरती रुसून नाराज होऊन दिंडी वनात आल्यात दिंडीवनात अर्थातच आताचे पंढरपूर रुक्मिणी मातेला मनवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण या पंढरपुरात आलेत . आणि संत महंत महात्मे दीन दुबळे लाखो नाहीतर करोडो भक्तांचे कैवारी झालेत , पंढरपूर हे दक्षिण काशी म्हणून देखील ओळखलं जातं , पंढरपुरात महाराष्ट्राचेच नाही तर अनेक परप्रांत राज्याचे देखील विठुरायाचे लाखो भाविकभक्त आहेत.. असा माझा पंढरीचा कैवारी
माऊली श्रीहरी
जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी ll
🖊️ कवयित्री ,लेखिका,अलका घाटे कल्याण मुंबई,9867488270
