कोतवाली पोलिसांची धडक कारवाई…लाखो रुपयांची सुगंधित तंबाखू व गुटखा हस्तगत
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सुगंधीत तंबाखू व गुटख्याची विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतच्या कब्जात बाळगणाऱ्या इसमावर कोतवाली पोलीसांनी कारवाई करत एकूण 3 लाख 99,712/-रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.हि कारवाई दि.27 जुलै 2025 रोजी कोतवाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती नुसार मार्केटयार्ड ते आनदंऋषीजी हॉस्पीटल रोड पॉलीटेक्नीक कॉलेज समोर करण्यात आली आहे.
शरद अर्जुन पवार वय-30 वर्षे,रा.जाम कौडगाव, ता.जि.अहिल्यानगर असे पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.पोकॉ/101 सोमनाथ सुधाकर केकान यांचे फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 684/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम-123, 223,274, 275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास म.पो.स.ई./शितल मुगडे या करित आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.सोमनाथ घार्गे साहेब,अपर पोलीस अधिक्षक श्री.वैभव कलुबर्मे साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री.अमोल भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे, म.पो.स.ई./शितल मुगडे, पो.स.ई/गणेश देशमुख,गुन्हे शोध पथकाचे पोसई/कृष्णकुमार सेदवाड,पोहेकॉ/बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी,सलीम शेख, विनोद बोरगे,सुर्यकांत डाके,योगेश कवाष्टे,राहुल शिंदे,अभय कदम,सत्यजीत शिंदे,अमोल गाडे,अतुल काजळे, सोमनाथ केकाण,महेश पवार, शिरीष तरटे,सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर,संदिप कव्हळे, प्रतिभा नागरे,हिना बागवान दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांच्या पथकाने केली आहे..