शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणूक करुन अधिक नफा मिळवुन देतो असे म्हणत ठकविणाऱ्या भामट्यांना सायबर पोलिसांनी केली अटक..तब्बल 47 लाखांची केली होती फसवणूक..सायबर पोलिसांनी असा केला तपास वाचा सविस्तर
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-IC Group Gold Stock Club A५ या कंपनीमध्ये शेअर ट्रेडीग मध्ये पैसे गुंतवणकु करुन अधिक नफा मिळवुन देतो असे ठकविणाऱ्या आरोपीना सायबर पोलिसांनी तपास करत अटक केली आहे.दि.२९ जुलै २०२४ रोजी सायबर पोलीस स्टेशनला फिर्यादींनी फिर्याद दिली की IC Group Gold Stock Club A५ व्हाट्सअपग्रुप एडमिन Anika Sharma व्हॉटसअॅप मोबाईल नंबर +९१९९७२४९२६४५ धारक याने फिर्यादीस शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणुक करुन अधिक नफा मिळवुन देतो असे सांगुन फिर्यादीचा विश्वास संपादन करुन फिर्यादीची ४७ लाख ०३,५४३/- रुपयांची फसवणुक केली आहे.
या फिर्यादीवरुन सायबर पोलीस स्टेशन येथे गुरनं १३/२०२४ वीएनएस ३१९ (२), ३१८ (४), सह माहिती तंत्रज्ञान कायदा-२००० चे कलम ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाच्या तपासामध्ये फिर्यादी यांनी कोटक महेंद्र बैंक व एचडीएफएससी बैंक यामध्ये पैसे भरले होते त्यावरुन नमुद बैंक खातेचे तांत्रीक विश्लेषण व बँकेचे केवायसीची माहिती घेऊन त्यामध्ये आरोपी जावेदभाई सुमारा व जिग्नेश कलसरीया यांचे नांवावर सदरचे खाते आढळुन आले व आरोपी जिग्नेश कलसरीया यास आरोपी महादेव गेढीया व रवी आजगिया यांनी अकांऊट ओपन करण्यासाठी मदत केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.तदनंतर गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नंबर (१) जावेदभाई मोहम्मदभाई सुमारा वय ४० वर्षे रा. ठी. गांव काजली ता. वेरावल जि. गिर सोमनाथ, गुजरात राज्य. (२) जिग्नेश मोहनभाई कलसरिया, वय २७ वर्षे रा.ठी. गांव सनोसरी, ता. गिरगढडा, जि. गिर सोमनाथ, गुजरात राज्य (३) महादेव जसुभाई गेढिया वय ३० वर्षे रा.ठी. रुम नं. ३५, शांतीविहार सोसायटी, पर्वत पटिया, सुरत शहर (४) रवी रामजीभाई आजगिया वय ३६ वर्षे रा.ठी. हाऊस नं. ३१. शिवदर्शन सोसायटी, कतरग्राम, सुरत शहर गुजरात राज्य यांना अटक करण्यात आली.
सायबर पोलीस स्टेशनचे आवाहन
नागरीकांना अहवान करण्यात येते की, IC Group Gold Stock Club A५ या कंपनीमध्ये शेअर ट्रेडीगमध्ये पैसे गुंतवणुक करुन अधिक परतावा देतो,कोण बनेगा करोड पती यामधुन आपणास २५ लाख रुपयेची लॉटरी लागली आहे, क्रेडिट कार्ड अॅक्टीव्हेशन करुन देतो,ऑनलाईन KYC अपडेट करुन देतो,पेट्रोल पंप एजन्सी देतो, ट्रेडिग अॅप डाऊनलोड करुन जास्त प्रमाणामध्ये परतावा देतो,ऑनलाईन लोन मंजुर करुन देतो,तसेच आपले स्वतःचे बैंक अकांऊट दुस-याला देऊ नये व आमिषाला बळी पडुन कोणालाही बैंक अकांऊट ओपन करुन त्यांना बँकेचे ऑनलाईन युझर आयडी,पासवर्ड,एटीएम कार्ड,चेक बुक,स्वतःचे मोवाईल नंबरचे सिमकार्ड असे देऊ नये व असे वेगवेगळया आमिषाला बळी पडु नये प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करतांना काळजी घ्यावी.तसेच कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणुक झाल्यास तात्काळ सायबर क्राईम पोर्टल हेल्पलाईन नंबर १९३० किंवा १९४५ यावर तक्रार करावी.
सदरची कामगिरी श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.मोरेश्वर पेंदाम, पोसई/सुदाम काकडे,पोलीस अंमलदार/अभिजीत अरकल, मोहम्मंद शेख,अरुण सांगळे, गणेश पाटील,अप्पासाहेब हिंगे,महिला अंमलदार सविता खताळ यांनी केली आहे.