तिरट जुगाराच्या क्लबवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड येथील तिरट जुगाराच्या क्लबवर छापा टाकून 9 आरोपीकडून 1 लाख 59,200/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.हि कारवाई 28 जुलै 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार केली आहे.
1) नितीन आश्रुबा रोखडे वय 50 वर्षे, रा. आष्टा, ता. आष्टी, जि. बीड, 2) जावेद इस्माईल बागवान वय 44 वर्षे, रा. तपनेश्वर रोड, जामखेड, ता. जामखेड, 3) संतोष नवनाथ कदम वय 42 वर्षे, रा. कुसडगांव ता. जामखेड, 4) नवनाथ सदाशिव जाधव वय 36 वर्षे, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड, 5) विजय विनायक कळसकर वय 53 वर्षे, रा. तपनेश्वर रोड, जामखेड, ता. जामखेड, 6) निलेश लक्ष्मण पेचे वय 40 वर्षे, रा. पोकळेवस्ती, जामखेड, ता. जामखेड, 7) जयसिंग विश्वनाथ ढोके वय 40 वर्षे, रा. भुतवडा, ता. जामखेड, 8) विठ्ठल मोहन भोसले वय 38 वर्षे, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड, ता. जामखेड, 9) विजय गहिनीनाथ जाधव वय 53 वर्षे, रा. कर्जत रोड, जामखेड असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.ताब्यातील आरोपी विरूध्द जामखेड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.427/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी,पोउपनि/अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार बिरप्पा करमल,ऱ्हदय घोडके, बाळासाहेब गुंजाळ,चंद्रकांत कुसळकर यांनी केलेली आहे.