भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्यीतील गुन्हेगार दोन वर्षांकरिता हद्दपार
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील इसम नामे जाबीर सादीक सय्यद (रा.शहा कॉलनी, गोविंदपुरा ता.जि.अहिल्यानगर) यांस दोन वर्षाकरीता हददपार केले बाबतचा आदेश सुधिर पाटील उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग अहिल्यानगर यांनी आदेश पारीत केला आहे.सदर हददपार इसमास दि.२९ जुलै २०२५ रोजी मुकुंदनगर परिसरातुन तात्काळ ताब्यात घेवुन अहिल्यानगर जिल्हयाचे सरहद्दीचे बाहेर सोडण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अहिल्यानगर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर,पोसई.गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार रेखा पुंड, किरण बर्वे,ईसराईल पठाण, पांडुरंग बारगजे,दिपक शिंदे,रवि टकले यांनी केली आहे.