पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा पुरस्कारासाठी “लालाय्लू ” कादंबरीची निवड
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-लालाय्लू’ या बृहद कादंबरीचे काही महिन्या पूर्वी प्रकाशन झाले.लालाय्लू या प्रा.संतोष भालेराव लिखित सहाशे पानी बृहद कादंबरीस साहित्य क्षेत्रातील अतिशय मानाचा समजला जाणारा ‘ पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा वेदना,स्वप्ने,इच्छा- आकांक्षा या समाजाचा समाजाच्या पटलावर लालाय्लू कादंबरीच्या माध्यमातून प्रदर्शित केल्या आहे.शिक्षकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधले आहे.लालाय्लू शिक्षण व्यवस्थेतील शेंडी लावणारी प्रवृत्ती वाढत आहे.त्याचे दर्शन या कादंबरीतून होत आहे.शिक्षण व्यवस्थेतील दाहकता या कादंबरीतून दिसून येत आहे.कादंबरी खूपच छान आहे.सामाजिक वास्तव लेखकाचे अनुभव अनुदानित शिक्षकांच्या संवेदना यातून सहाशे पानांच्या मोठ्या कादंबरीचे दर्जेदार लिखाण आहे.शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार वाढत आहे.
शिक्षकांकडून संस्थाचालकांच्या अवास्तव अपेक्षा,आर्थिक देवाण-घेवाण,शिक्षकांची होणारी पिळवणूक याचा स्पर्श कादंबरीतून झाला आहे.अशा ‘लालाय्लू’ बृहद कादंबरीस साहित्य क्षेत्रातील अतिशय मानाचा समजला जाणारा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा पुरस्कार जाहीर बद्दल कला,सांस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय,धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह चंदनापूरी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.