सहा महिने काम करूनही आरोग्य उपकेंद्रातील डाटा एन्ट्री ऑपरेटरला एक रुपया ही मानधन दिले नाही…मनसेचे गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन.. मनसेचे अविनाश पवार यांचा आक्रमक पवित्रा
पारनेर (दि.२९ प्रतिनिधी):- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत सुपा व खडकवाडी येथे अरुण माधव वाढवणे व देवजी पांडू मेंगाळ हे दोन युवक आयुष्यमान भारत उपकेंद्र सुपा व खडकवाडी येथे सहा महिने प्रशिक्षणार्थी म्हणून कामाला होते.या सहा महिन्यात या प्रशिक्षणार्थींना एक रुपयाही मानधन अद्यापपर्यंत देण्यात आले नाही. त्या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या वतीने पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दयानंद पवार यांना लेखी निवेदन देण्यात आले होते.
परंतु पारनेर पंचायत समितीचे संबंधित अधिकारी यांनी या प्रशिक्षणार्थीच्या मानधन देण्याबाबत अजिबात प्रतिसाद दिला नाही म्हणून मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार व रमेश साबळे यांनी सोबत डेटा एन्ट्री ऑपरेटर अरुण वाढवणे याला घेऊन अकरा वाजल्यापासून पारनेर पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी यांच्या दालनात प्रशिक्षणार्थीच्या मानधन विषयी ठिय्या आंदोलन पुकारले होते. या आंदोलन कर्त्यांशी गटविकास अधिकारी डी.बी पवार आणि आरोग्य अधिकारी प्रशांत कांबळे यांनी संवाद साधला. उडवा उडवीची उत्तर दिले असता अविनाश पवार यांनी आक्रमक पवित्रा घेताच प्रशिक्षणार्थीच्या मानधन विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक आरोग्य अधिकारी यांनी डाटा ऑपरेटरच्या निवडी करून सविस्तर यादी आमच्याकडे पाठवली होती त्यामुळे या प्रशिक्षणार्थींना मानधन देण्यासाठी आम्ही बांधिल नाही आपण या बाबत जिल्हाआरोग्य अधिकारी यांना तक्रार करावी असा सल्ला देण्यात आला यावर पवार यांनी आक्रमक होत तुम्ही चुक मान्य करत एम. ओ. ची चौकशी करून कारवाई करावी असे सांगितले असता आम्ही चौकशी करून कारवाई करु असे आंदोलन कर्त्याना लेखी पत्र देण्यात आले या दिलेल्या लेखी पत्रात नमूद करण्यात आले आहे की, देवजी पांडू मेंगाळ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी प्राथमिक आरोग्य केंद्र खडकवाडी उपकेंद्र व अरुण माधव वाढवणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी रुई छत्रपती उपकेंद्र सुपा यांची निवड यादी हि सदर वैद्यकीय अधिकारी यांनी शासन निर्णय क्रमांक सकीर्ण २०२४ अन्वये सदर उमेदवाराची निवड केलेली दिसून येत नाही या बाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
पारनेर पंचायत समितीचे प्रभारी .बी. डी. ओ. दयानंद पवार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश कांबळे यांनी प्रशिक्षणार्थींना मानधन न दिल्याच्या मुद्द्यावर दिलेले लेखी पत्र घेऊन लवकरच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल जो पर्यंत या दोन युवा प्रशिक्षणार्थींना मानधन मिळणार नाही तो पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लढा चालूच ठेवणार आहे.