अखिल भारतीय ग्राहक पंचायत अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीची निवड जाहीर..संगमनेर तालुक्याचे सुरेश राहाणे उपाध्यक्ष तर दिनेश थोरात सचिव
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):- अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र प्रांताच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली.कार्यकाळ २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सक्रिय कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला असून,ही निवड संगमनेर येथे पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली.या बैठकीला केंद्रीय पदाधिकारी सूर्यकांत पाठक,प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी,प्रांत कार्यकारिणी सदस्य अतुल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष शाहुराव औटी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राहाणे, अशोक शेवाळे जिल्हा सचिव दिनेश थोरात,सहसचिव सीताराम बोरुडे,जितेंद्र पितळे,कोषाध्यक्ष डॉ.अप्पासाहेब नरोडे महिला अध्यक्ष तथा महिला आयाम प्रमुख श्रीम.प्रा.अमिता कोहली,पर्यावरण आयाम प्रमुख अरुण कुलट,प्रचार आयाम प्रमुख कारभारी गरड,विधी आयाम प्रमुख संदीप गवळी,रोजगार सृजन आयाम प्रमुख दत्तात्रय झगडे,ग्राहक मार्गदर्शन सेवा आयाम प्रमुख हरिभाऊ चौधरी,जिल्हा कार्यकारणी सदस्य रामकृष्ण थोटे,भगवान गायकवाड,ज्ञानेश्वर फसले, प्रवीण जोशी,बाळासाहेब कोकाटे,यादव फरतडे,अश्विनी भालेराव, सुनीता पवार यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून ग्राहक जनजागृती, तक्रार निवारण,कायदेशीर सल्ला,पर्यावरण विषयक उपक्रम क्षेत्रात सक्रिय कामकाज केले जाईल.या निवडीमुळे जिल्हास्तरावर संघटनेचे कार्य अधिक गतिमान होईल,असा विश्वास नूतन जिल्हाध्यक्ष शाहुराव औटी यांनी व्यक्त केला. बैठक यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष विनायक वाडेकर,सदस्य सुभाष राहाणे,रोशन कोथमिरे,सीताराम पानसरे,सौरभ म्हाळस यांनी विशेष परिश्रम घेतले.