वीजबिल भरून नागरिक अद्यापही अंधारात..आम आदमी पार्टीचे शहर उपाध्यक्ष विजय लोखंडे आक्रमक
खेड (प्रतिनिधी):-मौजे मरकळ येथील बाजारेवस्ती येथील नागरिक अनियंत्रित विजेमुळे अंधारात यातना भोगत आहे.
येथील लोकवस्ती मधील 315 न डीपी गेली 7 महिन्यापासून दुरुस्तीची मागणी सौ.पूनम लोखंडे व आम आदमी पार्टीचे शहर उपाध्यक्ष श्री.विजय लोखंडे तसेच ग्रामस्थ यांच्याकडून केली जातं आहे. परंतु येथील अधिकाऱ्यांकडून कायम टाळाटाळ केली जात असून या कामाची देखभाल ही करण्याचे टाळले जातं असून अद्याप काम अपूर्ण आहे.तसेच माहिती अधिकारातून मिळाळेल्या माहितीनुसार प्रतीवर्षी साधारण 35 लक्ष एवढा खर्च फक्त मरकळ विभागाला देखभाल साठी वापरण्यात आला असून आळंदी कार्यालयात दुरुस्तीचे मटेरियल उपलब्ध नसल्यासचे कारण देऊन काम अपूर्ण आहे असे सांगितले जाते.
आता यामुळे नागीरकांना पिण्याचे आणि वापराच्या पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत.पुढील काम 2 दिवसात काम मार्गी न लावल्यास आळंदी कार्यालय येथे भीक द्या आंदोलनाचा इशारा सौ.पुनम लोखंडे यांनी व समस्त ग्रामस्थांनी संतप्त होत दिला आहे.