दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने जिल्हापोलीस अधीक्षक यांना निवेदन..फटाका वाहतूक करण्यासाठी कोणताही कायदेशीर परवाना लागत नसताना आर्थिक चिरीमिरी साठी व्यापाऱ्यांच्या गाड्या मुद्दाम अडवल्या जातात
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-फटाका व्यवसायिक श्री.रामचंद्र मुलतानी यांचा माल नुकताच कोतवाली पोलिसांनी बेकायदेशीरपणे जप्त केला म्हणून दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने सर्व सभासदांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष गणेश परभणे, सेक्रेटरी श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष सुरेश जाधव व विकास पटवेकर, ज्येष्ठ सदस्य देविदास ढवळे, शिरीष चंगेडे, अनिल टकले, निखिल परभणे,अरविंद साठे,सोमा रोकडे, सागर जाधव, रमेश बनकर, दाजी गारकर,सागर हरबा, अरविंद काळे, मयूर भापकर, संजय जंजाळे,उबेद खान, आदिनाथ दारकुंडे, संजय सुराणा, अमोल तोडकर, सुनील पोपटाणी, विजय मुनोत, राजेंद्र छल्लाणी, उमेश क्षीरसागर, सुनील आरे,गोरख खंदारे, कराळे सह इतर सदस्य उपस्थित होते.
दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने व्यापारी सदस्य अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात फटाक्यांची विक्री करीत असतात व सदर फटाका माल हा वाहतुकीने अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जात असतो परंतु नुकतेच कोतवाली पोलिसांनी असोसिएशनचे जेष्ठ सदस्य रामचंद्र मुलतानी यांचा फटाका माल पिंपरी चिंचवड येथील ग्राहकासाठी वाहतूक केले जात असताना कारवाई करून माल जप्त केला वास्तविक पाहता फटाका वाहतूक करण्यासाठी कोणतीही कायदेशीर परवाना लागत नाही असा भारत सरकारचा स्फोटक पदार्थ नियम 1983 पोटनियम 32(5) व 77(2) प्रमाणे फटाका वाहतूक करण्यास कोणत्याही कायदेशीर परवानगीची आवश्यकता लागत नाही असे जीआर असताना पोलिसांनी वाहतूक परवाना नसल्याने कायदेशीर कारवाई करणे व्यापाऱ्यावर अन्यायकारक आहे या पूर्वीही पोलीस प्रशासनातील काही मंडळी आर्थिक चिरीमिरी साठी व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवून त्रास दिलेला आहे व हा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे फटाका व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन असोसिएशन च्या वतीने पोलीस प्रशासनाने यापुढे व्यापाऱ्यांवर अशा पद्धतीने काही कारवाई करू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक यांची समक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले व त्याची प्रत जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना देण्यात आली आहे या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या पुढे व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही असे आश्वासन दिले व व्यापाऱ्यांनीही सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करण्याची ताकीद दिली.