अवैध दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई..चारचाकी वाहनासह तिघे ताब्यात
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अवैध विदेशी दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.1 यांनी अहिल्यानगर पुणे रोडवर पारनेर तालुक्यातील वाघुंडे टोलनाका येथे धडक कारवाई करत चारचाकी वाहनासह वेगवेगळ्या ब्रँडचे 33.75 ब.ली.विदेशी मद्य असा एकूण 7 लाख 28 हजार 560/-रू. किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सुभान मुसा सय्यद,अलीम आलमगीर सय्यद, संदीप लुईस आल्हाट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्री.प्रमोद सोनोने,श्री.प्रविण कुमार तेली, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.1 निरीक्षक श्री.एस.आर.कुसळे,श्री.ए.एन. जावळे दुय्यम निरीक्षक,श्री.व्ही. एन.रानमाळकर,सहा.दु.नि. जवान सर्व श्री.सुरज पवार, सुनील निमसे,चतुर पाटोळे, सिद्धांत गिरीगोसावी,निहाल शेख जवान नि वाहन चालक यांनी केली आहे.