डी.चंद्रकांत..चितळे रोडवरील धाडसी चोरीतील तिघे जेरबंद..बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असताना एलसीबीच्या पथकाने पुणे विमानतळावरून घेतले ताब्यात..गुन्हेगारी जगतात नुकताच सक्रिय झालेला खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीचा समावेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर शहरातील प्रसिद्ध असलेले डी. चंद्रकांत कपड्याचे दुकान अज्ञात चोरट्यांनी दि.3 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास फोडून दुकानातील तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.या घटनेबाबत दुकान मालक लक्ष्मण राजाराम दुलम यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये एक भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते व तसेच पोलिसांसमोर ही आव्हान निर्माण झाले होते.घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना सूचना देऊन पथक तयार करून कारवाई करण्यास सांगितले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने घटना ठिकाणी जाऊन व्यावसायिक कौशल्य, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास, गुप्त माहिती आणि मूलभूत तपासाच्या आधारावर माहिती काढले असता पथकास माहिती मिळाली की,सदरील आरोपी हे पुणे विमानतळ इथून बिहारला पळून जायच्या तयारीत आहेत. पथकाने विमानतळ येथे सापळा रचून मेहताब उर्फ आयान उर्फ जल्ला शाफीयाना शेख (रा. एमआयडीसी पत्रा शेड पुणे), अश्फाक दिलशाद शेख (रा. ज्योतिबा नगर काळेवाडी पुणे), निसार अली नजर मोहम्मद (रा. हवेली पुणे) या तिघांना अटक केली. तपासा दरम्यान या आरोपींनी केवळ जिल्ह्यातच नव्हे तर पुणे शहरात देखील अजून एक घरफोडी केली आहे. विशेष म्हणजे यातील एक आरोपी हा वयाने कमी असून नुकताच गुन्हेगारी जगतात सक्रिय झालेला असून खुणाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आहे.पकडलेल्या आरोपींकडे विचारपूस केली असता दिलशाद शेख याने त्याच्या बहिणीच्या बँक खात्यावर 1 लाख 98 हजार रुपये एटीएम मशीनद्वारे ऑनलाईन वर्ग केले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये,पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ,पोलीस अंमलदार शाहिद शेख,लक्ष्मण खोकले,फुरकान शेख,सोमनाथ झांबरे,रोहित येमुल,सागर ससाने,अमृत आढाव,प्रशांत राठोड,भगवान धुळे,अर्जुन बडे यांनी केली आहे.