देवगड विद्यालयास माजी विद्यार्थ्यांकडून संगणक भेट..विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयातील सन २०००- ०१ दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्नेह मेळाव्यातून काही रक्कम बचत केली.बचत केलेल्या रक्कमेतून एक संगणक विद्यालयास भेट देण्यात आला.तसेच त्याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले.याप्रसंगी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका शीला हांडे, आणि माजी मुख्याध्यापक रमेश पावसे,वृक्षमित्र गणपत पावसे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उगले एस.के.यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.पूर्वी शालेय शिक्षण घेताना अनेक अडचणी आणि त्यावरती मात करून आम्ही शाळा शिकलो.आता आपल्या विद्यालयास भव्य,दिव्य इमारत आहे.सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.याचा चांगला वापर करून जास्तीत जास्त गुण मिळवावेत.
दहावी व बारावी हा जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो,तेव्हा खूप अभ्यास करा.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित होते.शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे असं ते नेहमी म्हणायचे.शिक्षणासारखा दुसरा सर्वोत्तम गुरू नाही या मतावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ठाम होते.एखाद्या समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असं ते म्हणायचे.मुला-मुलींना शिक्षित करा,त्यांना पारंपरिक व्यावसायिक कामात गुंतवू नका.केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुमचे ज्ञान वापरणे पुरेसे नाही. सुधारण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग केलाच पाहिजे.
त्याप्रमाणे जर विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले तर भविष्यामध्ये कोणी कलेक्टर, डॉक्टर,वकील,समाजसेवक, उद्योगपती,आय.ए.एस. अधिकारी म्हणून आपल्या विद्यालयातील विद्यार्थी देशसेवा करताना दिसतील तसेच हिवरगाव पावसा गावचे नाव उज्वल करावे अशी अपेक्षा
विद्यालयाचे माजी विद्यार्थी मच्छिंद्र काशिनाथ गडाख यांनी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केली. यावेळी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका शीला हांडे, आणि माजी मुख्याध्यापक रमेश पावसे,वृक्षमित्र गणपत पावसे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उगले एस.के.यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी संदीप गडाख,शैला गडाख,सरुबाई दवंगे,लीना भालेराव यांच्या सह माजी विद्यार्थी तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.