शासकीय रुग्णालयात डॉक्टर व स्टाफच्या हलगर्जी पणामुळे महिला मयत..डॉक्टर व स्टाफ यांना शासकीय सेवेतून निलंबित करा आझाद समाज पार्टीची मागणी
वाशिम (प्रतिनिधी ):-४ ऑगस्ट २०२५ रोजी वाशिम येथील शासकीय रुग्णालयात श्वेता पाधगान या महिलेचा उपचारा दरम्यान दुखत मृत्यू झाला होता.ही दुःखद घटना डॉक्टरांच्या व तेथील स्टाफच्या हलगर्जी पणामुळे झाली असल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी व आझाद समाज पार्टीच्या महिला आघाडीने केला आहे.
यावेळी आझाद समाज पार्टीच्या विदर्भ प्रमुख रचना कोकरे व त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांनी तात्काळ पिडीत कुटुंबाची भेट घेत सांत्वन करत दवाखान्यातील डॉक्टर व स्टाफ वर संताप व्यक्त करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून निलंबित करून पिडीत कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
