अहिल्यानगर पोलीस दलात खळबळ पोलीस अंमलदाराने घेतली लाच गुन्हा दाखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)
*==* *प्रेसनोट* *==*
यशस्वी सापळा कारवाई*
▶️ *युनिट – * अहिल्यानगर*
▶️ *तक्रारदार-* महिला, वय 32 वर्षे, अहिल्यानगर
▶️ *आरोपी लोकसेवक*
श्री संभाजी शिवाजी घोडे वय 32 वर्ष धंदा नोकरी पोलीस कॉन्स्टेबल राहणार श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा,जिल्हा अहिल्यानगर
*(वर्ग ३)*
▶️ *लाचेची मागणी-*
20000/- तोडजोडीअंती 3000 रुपये
▶️ *लाच स्वीकारली-*
3000/-
▶️ * *लाचेचे कारण**.
यातील तक्रारदार ह्या कुटुंबासह श्रीगोंदा येथे राहण्यास आहेत त्यांचा मुलगा सादिक हा शिक्षण घेत असून त्याचे विरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज करण्यात आलेला होता त्या अनुषंगाने आलोसे यांनी तक्रारदार यांच्या मुलाला पोलीस स्टेशन येथे बोलविले होते त्याचवेळी तक्रारदार यादेखील पोलीस स्टेशनमध्ये गेल्या होत्या त्यावेळी तक्रारदारांनी मुलाच्या विरोधात ज्यांनी अर्ज केला होता त्यांच्याशी बोलणे करून प्रकरण आपसात मिटवले होते. परंतु आलोसे यांनी तक्रारदार यांच्या मुलाचा मोबाईल ताब्यात घेऊन तक्रारदार यांना म्हटले की मी तुमचे प्रकरण मिटविणे करिता मध्यस्थी केली तुमच्या मुलावर गुन्हा दाखल झाला असता तो गुन्हा दाखल होऊ दिला नाही त्या करिता मला 20000 रुपये द्या तरच तुमचा मोबाईल परत देईल. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाप्रवि अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार नोंदविली. सदर तक्रारीप्रमाणे दिनांक 11 व 12/08/2025 रोजी आलोसे यांचे विरुद्ध लाच मागणी पडताळणी केली असता आलोस यांनी तक्रारदार यांचेकडे सदर प्रकरणात मदत केली त्या बदल्यात 3000 रुपयांची पंचांच्या समक्ष मागणी करून लाच रक्कम स्वतः स्वीकारण्याची तयारी दर्शवली त्याप्रमाणे आज दिनांक 12 रोजी सापाळा कारवाई दरम्यान आलोसे यांनी तक्रारदार यांचे कडून स्वतः 3000 रुपयांची लाच स्वीकारलेले आहे आलोसे याना जागीच लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आलेले आहे
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
▶️ *सक्षम अधिकारी*
माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर
▶️ *सापाळा व तपास अधिकारी*
श्री. अजित त्रिपुटे,
पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर
मो.नं. 8329701344
▶️ *सापळा पथक* :-
पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रवी निमसे पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कराड, पोलीस कॉन्स्टेबल वैभव सुपेकर चालक पोलीस हवालदार हारून शेख, चालक पोलीस हवालदार लाड सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर
▶️ *मार्गदर्शक-
*1) मा. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक*
मो. क्र.8888832146.*
2) *मा. माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक*,
ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मो.क्र.9922266048
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगर तहसील कार्यालय सावेडी अहिल्यानगर
*@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677
*@ मोबा.क्रं. 8329701344
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
==================*