वेठबिगारीतुन 3 पिडीतांची सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-वेठबिगारीतुन 3 पिडीतांची सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी श्री. किरणकुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना इसम नामे जाकिश बबड्या काळे रा.भोसले आखाडा, बुरुडगांव रोड व त्याचा मेव्हणा किशोर पोपट चव्हाण रा. चोकनवाडी,अरणगांव, ता. जि. अहिल्यानगर अशांनी तीन इसमांना कोठुन तरी आणुन त्यांना जाकिश काळे याचे घरी ठेवुन त्यांना उपाशी ठेवुन व मारहाण करुन त्यांचेकडुन वेठबिगारी करुन घेत असलेबाबत माहिती प्राप्त झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पथक तयार करून पथकाने तात्काळ जाकिश बबड्या काळे याचे राहते घरी जावुन खात्री सदर ठिकाणी 1) फारुक मेहबुब शेख वय 55 वर्षे, रा. ताजबाग, मोमीनपुरा, ता. जि. नागपुर, 2) कृष्णाराम रंगनाथ रा. पामगढ, बिलासपुर, उत्तरप्रदेश, 3) बाबुजी सुरजबल्ली वय 25 वर्षे, रा. सदर असे मिळुन आले. सदर इसमांकडे विचारपुस करता त्यांनी त्यांना इसम नामे जाकिश बबड्या काळे, किशोर पोपट चव्हाण अशांनी मागील 01 ते 02 वर्षापासुन आणुन त्यांचेकडुन बळजबरीने गायीचे गोठ्यातील काम करुन घेवुन वेठबिगार म्हणुन काम करण्यास डांबुन ठेवले आहे.तसेच त्यांनी कामे न केल्यास त्यांना जेवण न देता हाताने मारहाण करुन शिवीगाळ,धमकी देवुन गुलामाप्रमाणे वागणुक दिल्याचे सांगितले.ताब्यात घेण्यात आलेला इसम नामे 1)जाकिश बबड्या काळे वय 35 वर्षे – रा. जयपुर गोडावुनसमोर, भोसले आखाडा, बुरुडगांव रोड, ता. जि. अहिल्यानगर व 2) किशोर पोपट चव्हाण रा. चोकनवाडी, अरणगांव, ता. जि. अहिल्यानगर (फरार) यांचेविरुध्द पोना/836 बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 725/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 143 (1)(अ)(ब)(क), 143 (2), 143 (3), 140 (4), 142, 146,351 (2), 352, 115(2), 127 (2) सह बोन्डेड लेबर सिस्टम (अबोलिशन) ऍ़क्ट 1976 चे कलम 16 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी,पोउपनि/राजेंद्र वाघ,पोलीस अंमलदार ऱ्हदय घोडके,सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे,सागर ससाणे,विशाल तनपुरे,रोहित येमुल,अरुण मोरे,महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे,ज्योती शिंदे यांनी केलेली आहे.