मॅनेजरने कंपनीतील कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ तोंडात चापट मारून जीवे मारण्याची दिली धमकी
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर मधील नगर दौंड रोडवरील कायनेटिक इंजिनीअरिंग कंपनीत मॅनेजर असलेल्या शशिकांत गुळवे याने कंपनीत काम करणाऱ्या विवेक विक्रम गायकवाड या कर्मचाऱ्यास जातीवाचक शिवीगाळ करून तोंडात चापट मारून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत फिर्यादी विवेक गायकवाड यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दि. १२ ऑगस्ट रोजी रीतसर तक्रार दाखल केली होती. फिर्यादी गायकवाड हे इन्क्रिमेंट पत्रासाठी एच.आर.ऑफिसमध्ये गेले होते तिथे मॅनेजर शशिकांत गुळवे याने त्यांना,महार-मांगाला पर्मनंट केलं तर डोक्यावर बसता,अशी जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहे.