७९ व्या स्वांतत्र्यदिना निमीत्त अहमदनगर कॉलेज येथे सायबर क्राईम अव्हरनेस प्रोग्रॅम व अंमली पदार्थ विरोधदिन सप्ताह कार्यक्रम मोठ्या संख्येने संपन्न
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-15 ऑगस्ट ७९ व्या स्वांतत्र्यदिना निमीत्त अहमदनगर कॉलेज येथे सायबर क्राईम अव्हरनेस प्रोग्रॅम व अंमली पदार्थ विरोध दिन सप्ताह कार्यक्रम मोठ्या संख्येने पार पडला.एनसीसी कैडेट यांना स्वांतत्र्य दिनाचे पार्श्वभुमीवर सायबर क्राईम अव्हरनेस प्रोग्रॅम व अंमली पदार्थ विरोध दिन सप्ताह कार्यक्रम कॉलेजमध्ये घेण्यात आले.प्रथमत एनसीसी कैडेट यांना सायबर गुन्हे कसे घडतात,सायबर गुन्हेगार कोण कोणत्या पद्धतीने आपल्याली फसवणुक करतात याबाबत अनेक उदाहरणे देऊन त्यांची सायबर फसवणुक होऊ नये म्हणुन स्वतःआपण काय काळजी घेतली पाहिजे याबाबत सविस्तर रित्या त्यांना माहिती देण्यात आली.
अमली पदार्थामुळे होणारे परिणाम व त्यावर प्रतिबंधाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली व एनडीपीएस कायदयाची व आयटी अॅक्ट कायदयाची माहीती देऊन नमुद प्रत्येक कलमाला किती शिक्षा आहे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.नमुद कार्यक्रमास ६० ते ७० एनसीसी कैडेट व त्यांचे प्रशिक्षक श्री. जाधव सर हे हजर होते.सदरील कार्यक्रम हा श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक यांच्या सुचने प्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.मोरेश्वर पेंदाम, पोलीस उपनिरीक्षक श्री.सुदाम काकडे,पोलीस नाईक श्री. अभिजीत अरकल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.