चक्क महिला वकिलाची फसवणूक करून अंगावर पेट्रोल ओतून जीवे मारण्याचा केला प्रयत्न..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एका महिला वकिलेचा विश्वास संपादन करून मोठी फसवणूक करण्यात आली असून त्यानंतर तिच्यावर मारहाण तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.फिर्यादी महिला गेल्या काही वर्षांपासून आपल्या मुलगा व आई-वडिलांसह राहात होती.वकिली व्यवसायातून उपजीविका करत असताना तिची ओळख काही व्यक्तींशी झाली.या ओळखीचा गैरफायदा घेत संबंधित आरोपींनी सुरुवातीला सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम उधार घेतली.
त्यानंतर मोबाईल अॅप्सद्वारे देखील विविध वेळा मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्याचे फिर्यादी महिलेचे म्हणणे आहे. मात्र परतफेड न करता आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला.दरम्यान, पीडितेने पैसे व सोन्याची मागणी केली असता, आरोपींनी तिला पुण्यातील एका ठिकाणी बोलावून नेले व तेथे मारहाण केली. एवढेच नव्हे तर श्रीगोंद्यातील वैभवनगर परिसरात तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हॉटेलच्या मागील भागात ओढणीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र झटापटीत ती निसटून बाहेर आली व पोलिसांना कळवून आपले प्राण वाचविले.या सर्व घटनेनंतर पीडितेने महिला आयोगाकडे तक्रार दिली होती. त्याचबरोबर पुन्हा एकदा धमकी देत खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी आरोपींकडून दिल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.