देवगड विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न..गायक हरिश्चंद्र भालेराव यांच्या देशभक्तीपर गाण्यांनी विद्यार्थी मंत्रमुग्ध
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे देवगड माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कवी गायक हरिश्चंद्र तथा हरिदास भालेराव यांच्या देशभक्तीपर गीते व लोकगीते सादरीकरणाने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा उगले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.त्याप्रसंगी सरपंच सुभाष गडाख, राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रमेश पावसे,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे,जेष्ठ संपादक यादवराव पावसे, ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर पावसे,वृक्षमित्र गणपत पावसे, कॅनरा बँकेचे व्यवस्थापक,भास्कर पावसे,सिताराम गडाख गुरुजी,पत्रकार नितीनचंद्र भालेराव,संतोष पावसे,विशाल भालेराव,मच्छिंद्र गडाख यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर कॅनरा बँक शाखा हिवरगाव पावसा शाखाधिकारी राहुल गाडे व अमन रानडे यांच्या सहकार्याने ५ वी ते १० वी च्या वर्गातून एस. सी.प्रवर्गातील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण २४००० रुपये शिष्यवृती देण्यात आली.तसेच शालेय गणवेशाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.कवी गायक हरिश्चंद्र भालेराव सह ढोलकी वादक मधुकर भालेराव यांच्या देशभक्तीपर गीते व लोकगीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे स्वतंत्र दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायत सदर केली.अनेक ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी गावचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी पालक,कॅनरा बँकेचे कर्मचारी,विद्यालयातील शिक्षक नेहे व्ही.आर.,माने एम.ए.,तातळे एस.एम.,राहाणे आर.बी.,वाघ एस.डी.,थोरात डी.डी.,कुदळ ए. एस.,कातोरे सर,श्रीमती.वर्पे एस.डी.,शिरतार एस.एस.,पवार एस.बी.,भालेराव आर.ए.यांच्या सह सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.