बंदुकीचा धाक दाखवून पत्नीस पतीची मारहाण..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- पाईपलाईन रोड येथे राहणाऱ्या वकील महिलेस त्यांचे पती निखिल चंद्रकांत शेकडे यांनी बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केल्याची घटना नुकतीच 14 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये महिलेने दिलेल्या तक्रारी वरून पती निखिल यांनी दारूच्या नशेत त्यांच्यावर चारित्र्याचा संशय घेत शिवीगाळ केली.यानंतर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत मारून टाकीन अशी धमकी दिली.तसेच बंदुकीचा धाक दाखवून यांच्या गळ्याला धरले. याप्रकरणी अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.