
देवळी प्रतिनिधी(सागर झोरे):-मागील एक वर्षापासून नगरपरिषदवर प्रशासकाची नियुक्ती शासनाने केली आहे.आता देवळी नगरपरिषद वर प्रशासकाचे राज्य आहे.परंतु या प्रशासकाच्या राज्यात देवळीतील सामान्य जनतेच्या समस्येकडे नगर प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे त्यामुळे शहरांमध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहे.शहरातील नागरिक आपल्या समस्या घेऊन नगरपरिषदकडे चकरा मारत असतात परंतु कार्यालयीन कर्मचारी तसेच अधिकारी त्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असतात त्यामुळे जनसामान्यमध्ये नगर प्रशासनाच्या विरोधात असंतोष निर्माण झालेले आहे.देवळी शहरांमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी देवळी शहरांमध्ये अनेक प्रसाधनगृह बनविण्यात आलेले आहे परंतु त्या प्रसाधनगृहामध्ये अस्वच्छता,व त्या प्रसाधन गृहाला दारे सुद्धा नाही,प्रसाधन उघड्यावर नागरिकांना करावे लागत आहे,शहरातील अनेक भागांमध्ये नाल्या सुद्धा साफ होत नाही,नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे,शहरातील अनेक भागांमध्ये स्टीट लाईट बंद पडलेले आहेत,शहरामध्ये अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झालेले आहे,जैन भवन परिसरात जुनी पाण्याची विहीर उघडी पडलेली आहे त्यामध्ये अनेक मुके प्राणी पडून मृत्यू झालेले आहे त्या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रार देऊन सुद्धा नगरपरिषद प्रशासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही.देवळी नगर परिषदचे मुख्य अधिकारी नेहमीच आजारी असतात त्यामुळे ते आपल्या कार्यालयात येऊ शकत नाही देवळी नगरपरिषदचे कारभार उपमुख्यअधिकारी शिंदे बघत असतात परंतु समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांना ते उलट सुलट शब्दात उत्तरे देऊन परत पाठवतात तसेच त्यांच्या काळात नगरपरिषद प्रशासनामध्ये भ्रष्टाचार खोलवर गेलेला आहे.आपल्या मर्जीतील ठेकेदारांना अभय देऊन कामे होत आहे त्यामुळे देवळीकर जनता त्रस्त झालेली आहे अशा काम चोर नगर प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर चौकशी करून प्रशासनाने कारवाई करावी असे सूर देवळीकर जनतेतून निघट आहे.नगरपरिषद निवडणूक लांबल्यामुळे देवळी शहरातील हवसे,घवसे,नवसे,डोक्याला बाशिंग बांधून नगरपरिषद निवडणुकीची तयारी करीत होते परंतु ते अनेक कार्यक्रमांवर स्वतःजवळचे पैसे खर्च करून आता थकलेल्या अवस्थेत दिसत आहे आणि कित्येकांनी तर नगरपरिषद निवडणुकीची आस सुद्धा सोडली आहे जर निवडणूक अजून सहा महिने झाली नाही तर हवसे,घवसे,नवसे, कर्जबाजारीपणामुळे शहर सोडून पलायन करतील असे मत शहरातील जनता व्यक्त करीत आहे.
