नळदूर्ग प्रतिनिधी (अजित चव्हाण):-नळदुर्ग येथे गेल्या अनेक वर्षांपासून महावितरणचे उपविभागीय कार्यालय मंजूर व्हावे यासाठी प्रस्ताव दाखल केला होता.परंतु अद्याप पर्यंत ते सर्व प्रस्ताव हे धूळखात पडून आहेत उपविभागीय कार्यालय शहरात कार्यान्वित केल्यास वीज बिल दुरुस्ती,बिलिंग,थ्री पेज डिमांड,फिल्टर ऑफिस,स्वतंत्र निधी,अशा अनेक बाबी सोयीस्कर होणार आहेत.यामुळे शहरासह हद्दीतील गावात वीज ग्राहकांची संख्या जवळपास ३५- ४० हजारावर आहे. बोळेगाव सारख्या गावातील लोकांना तर कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ७० किमीचे अंतर कापून जावे लागत आहे.व पहिल्या फेरीत काम होत नसल्याने हेलपाटे मारण्याचे काम करावे लागत आहे. यामुळे प्रशासनाने या महत्वूर्ण बाबीकडे तात्काळ लक्ष घालून हे उपविभागीय कार्यालयाचे प्रस्ताव मंजूर करावे व नळदूर्ग येथे सुरू करून ग्राहकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऊर्जा विभागाकडे केली आहे.निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्षरी आहेत.
