वर्धा प्रतिनिधी(सागर झोरे):-मकर संक्रांतीची जुनी परंपरा उखाणे तसेच भेटवस्तू देऊन साजरा करण्याची प्रथा आजही चालू आहे.लहान मुलांची चॉकलेट,बिस्कीट गोळ्यानी याची लूट करण्यात येते पण सर्वधर्मसमभाव सांस्कृतिक कलामंच संस्थे वर्धा मध्ये असलेल्या भजनी मंडळांनी यावेळी एक अनोखा असा आगळावेगळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात ६५ ते ७० वर्षाच्या वयोवृद्ध कलावंतांचा त्रिवेणी दंडारे व गोवर्धन दंडारे या दोन्ही पती-पत्नीचा चॉकलेट गोळ्या बिस्कीटनी लूट करून कार्यक्रम सादर करण्यात आला.पाथरी एकुरली मालेकर लेआउट वर्धा हळदी कुंकू उखाणे घेऊन हा कार्यक्रम सादर करण्यात आला.यावेळी सर्वधर्मसमभाव सांस्कृतिक कलामंच संस्थेच्या अध्यक्षा दीपमालाताई मालेकर म्हणाल्या की मकर संक्रांतीनिमित्त उखाण्याचा घेतलेला कार्यक्रम हा समाजासाठी एक प्रेरणादायी आहे व इथून पुढेही प्रत्येक मकर संक्रांतीला असे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे संस्थेतर्फे आयोजन करणार असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या,सदरच्या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”