दहशत माजवुन खुनाच्या प्रयत्न करणाऱ्या ५ आरोपींना एलसीबीने ठोकल्या बेड्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात दहशत माजवुन खुनाच्या प्रयत्न करणाऱ्या ५ आरोपीना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे.दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी दाखल गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली की,सदर गुन्हयातील काही आरोपी हे राजुरी ता.जामखेड जि. अहिल्यानगर येथे येणार आहेत.
त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचुन सशंयीत आरोपीस ताब्यात घेवुन,त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नांव वैभव विजय साबळे, वय २९ वर्षे,कल्याण पांडुरंग मोहोळकर,वय २८ वर्षे, अभयसिंह किसन राजेभोसले, वय २३ वर्षे,नरेंद्र शहाजी सोनवणे,वय २३ वर्षे,साईनाथ संपत राजपुत वय २१ वर्ष,सर्व रा.नान्नज ता.जामखेड जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.वरील सर्व आरोपीतांना गुन्हयाचे पुढील तपासकामी जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पोहेकॉ.हृदय थोडके,पोना. श्यामसुंदर जाधव,पोकॉ.अमोल कोतकर,पोकॉ.प्रकाश मांडगे, पोकॉ.अमोल आजबे,चालक पोहेकॉ.महादेव भांड यांनी केलेली आहे.
