स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..लाखो रुपयांचा मावा जप्त..बीडमध्ये मावा कारखाना तर अहिल्यानगरमध्ये सर्रास विक्री..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात पाथर्डी शहरातील विविध ठिकाणी शरीरास हानिकारक असलेल्या मावा अडयावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत ५ आरोपींकडुन २५ लाख ८०,८८०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली आहे.दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आलेले होते.
हे पथक पाथर्डी शहरामध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असताना,पथकास पाथर्डी शहरात ओयो बाईक शोरुम जवळ पाथर्डी ते तीसगाव जाणारे रोडचे बाजुला एक इसम महाराष्ट्रात राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला व शरीरास अपायकारक होईल असा खादय पदार्थ सुंगधीत तंबाखु व सुपारी मिश्रीत तयार मावा खाण्यास अपायकारक आहे हे माहित असताना देखील त्याची निर्मीती करुन एक इसम स्वंतःचे कब्जात बाळगुन त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी इसम नामे अक्षय गणेश विधाटे (वय ३० वर्षे, रा. शिवशक्तीनगर पाथर्डी,ता. पाथर्डी,जि.अहिल्यानगर) हा हातात पिशवी घेवुन त्यामध्ये माव्याच्या पुड्या भरुन ती लोकांना विक्री करताना मिळुन आला.त्याचे जवळ १५००/-रुपये किंमतीच्या वायरच्या पिशवीमध्ये ५० तयार माव्याच्या पुडया मिळुन आल्या. त्यास मावा कोठे बनवतो व कश्याच्या साहयाने बनवतो त्याने सदरचा मावा तो स्वंतःसावरगाव घाट ता.आष्टी जि.बीड) येथे एका पत्राचे शेडमध्ये मशीनद्वारे बनवित असल्याचे सांगुन,त्याने ती जागा दाखविली.सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता,तेथे काही लोक लोखंडी मशीनचे साहयाने सुंगधीत तंबाखु,सुपारी मिश्रीत करुन मावा तयार करताना व तयार मावा वजन करुन प्लास्टीकच्या पुड्यांमध्ये भरतांना मिळुन आल्याने,त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे शुभम विकास पारखे वय २८ वर्षे,रा. रामगिरीबाबा टेकडी पाथर्डी,ता. पाथर्डी,जि.अहिल्यानगर,रियाज नजिर बेग वय ३० वर्षे,रा. चिंचपुर रोड पाथर्डी,ता.पाथर्डी जि. अहिल्यानगर,अनिल भाऊ काळोखे,वय २५ वर्षे, रा. कोरेगाव रोड पाथर्डी,ता.पाथर्डी जि.अहिल्यानगर व पळुन गेलेल्या इसमाचे नाव आदित्य भस्करे,रा.एम आय डी सी बीड (फरार) असे असल्याचे सांगीतले.नमुद ठिकाणावरुन सुंगधीत तंबाखु,सुंगधीत तयार मावा,सुंगधीत मावा तयार करण्यासाठी लागणारी साधनसामुग्री,व दोन चारचाकी वाहने असा एकुण २५,४८,९३०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच पाथर्डी शहरातील माणिकदाँडी रोडवरील एम एम निराळी शाळेच्या कम्पाऊंडच्या शेजारी प्लॅटीना दुचाकी गाडीवर येवुन तयार माव्याची विक्री करणारा इसमा नामे इस्माईल हुसेन शहा, वय ३२ वर्षे, रा. नाथनगर पाथर्डी, ता. पाथर्डी जि.अहिल्यानगर याचेवर छापा टाकुन त्याचे कडुन तयार मावा भरलेल्या पुडया व एक प्लॅटीना कंपनीचा मोटारसायकल असा एकुण ३१,९५०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ.बाळासाहेब सुभाष खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अनुक्रमे १) गु.र.नं. ९०७/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) प्रमाणे २) गु.र.नं. ९१०/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आले असुन, दोन्ही गुन्हयात एकुण २५,८०,८८०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि.हरिष भोये, पोलीस अंमलदार सुरेश माळी, सोमनाथ झांबरे,बाळासाहेब खेडकर,आकाश काळे,सागर ससाणे,हृदय घोडके यांनी केलेली आहे.
