मा.सरपंच गोकुळ वाळुंज मित्र मंडळातर्फे एक नाविन्यपूर्ण उपक्रम..गरजवंत कुटुंबांना पिठाच्या गिरण्या व कडबाकुट्टी मशीन वाटप
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- पारनेर तालुक्यातील राजकीय व बाजारपेठेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव तुर्क गावात गरजूवंत 15 ते 20 कुटुंबांना पिठाच्या गिरण्या तसेच 10 ते 15 पशुपालक कुटुंबाला कडबाकुटी या वस्तु अल्पदरांमध्ये उपलब्ध करुन देऊन मा.सरपंच गोकुळ वाळुंज मित्र मंडळातर्फे एक नाविन्यपूर्ण उपक्रम श्रीगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सकाळी वाटप करून पार पडला आहे.
तसेच पिंपळगाव तुर्क या पारनेर तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये या पुढेही मा.सरपंच गोकुळ वाळुंज मित्र मंडळाच्या वतीने पिठाची गिरणी,कडबाकुटी व शिलाई मशिन या वस्तु पुढेही सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांना एक मदतीचा हात म्हणून 50% डिस्काउंट मध्ये भविष्यातही उपलब्ध करून दिल्या जातील असे मा.सरपंच गोकुळ वाळुंज यांनी गावकऱ्यांना आश्वासित केले आहे.
