वाहनचालकांना कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन लुटमार.. दोन टोळयांमधील 4 आरोपी जेरबंद..स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर-पुणे हायवे रोडवरील वाहन चालकांना कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन लुटमार करणाऱ्या दोन टोळयांमधील 4 आरोपी,3 विधीसंघर्षीत बालक स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद करण्यात आले असून या आरोपींकडुन सुपा येथील जबरी चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आले आहे.सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं.323/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(2) प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपींचा पथक शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत तसेच व्यावसायिक कौशल्याचे आधारे माहीती मिळाली की,सदर चा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे यश भाऊसाहेब शिरसाठ (रा.गांधीनगर बोल्हेगाव ता.जि. अहिल्यानगर) याने त्याच्या साथीदारांसह केला असुन,तो सध्या गांधीनगर बोल्हेगाव, अहिल्यानगर येथे त्याचे साथीदारांसह बसलेले असल्याची माहिती मिळाली.
पोनि.किरणकुमार कबाडी यांनी तात्काळ पोलीस पथकास माहिती कळवून कारवाई करण्यास सांगितले पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे बातमीतील माहिती प्रमाणे काही इसम मिळुन आले.तसेच अहिल्यानगर ते पुणे जाणारे रोडवरील सुपा टोलनाक्या जवळील म्हसने फाटा येथे रोडचे कडेला उभा असलेल्या ट्रकमधील चालकास कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन त्याचे ताब्यातील मोबाईल फोन,रोख रक्कम बळजबरीने चोरलेबाबत आरोपीनी कबुली दिली.ताब्यातील आरोपीतांना व विधीसंघर्षीत बालकांस सुपा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयांचा पुढील तपास सुपा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे,अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार,पोहेकॉ/विष्णु भागवत,पोहेकॉ/गणेश लोंढे, पोना/भिमराज खर्से,पोना/ रिचर्ड गायकवाड,पोकॉ/बाळु खेडकर,पोकॉ/भाऊसाहेब काळे, पोकॉ/मनोज साखरे,पोहेकॉ/फुरकान शेख,पोकॉ/ प्रशांत राठोड व चालक अरुण मोरे, सुपा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक, ज्योती गडकरी,पोसई मंगेश नागरगोजे,पोलीस अंमलदार मेघराज कोल्हे,योगेश सातपुते यांनी केलेली आहे.
