पंधरा दिवसातच तपास करून चार्जशीट कोर्टात दाखल.. अवघ्या दोन महिन्यातच निकाल..कोतवाली पोलिसांचा सातत्याने पाठपुरावा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- वर्षानुवर्षे निकाल लागत नसल्याने पक्षकारांची ससेहोलपट असल्याचे अनेकदा पाहायला मिळत असते.मात्र अहिल्यानगरच्या न्यायालयात अवघ्या कमी वेळात म्हणजेच दोन महिन्यात खटला निकाली काढण्यात आला आहे.यात आरोपीला पाच वर्षांची शिक्षा होऊन पाच हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती प्रतिभा पाटील यांनी ठोठावली आहे. यात मुख्यत पोलीस ठाण्याचे पीएसआय गणेश देशमुख यांचा पाठपुरावा कामी आला आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, सहाय्यक फौजदार लक्ष्मण बोडखे,पोलीस अंमलदार विशाल दळवी,पोकॉ.सत्यम शिंदे, सोमनाथ केकाण,यांची खटल्यात महत्त्वपूर्ण मदत झाली असून पंधरा दिवसात तपास पूर्ण करत दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.न्यायालयाने सदरचा खटला अंडर ट्रायल चालवून निकाली काढला.
