गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस बेड्या..नगर क्राईम ब्रँचची कारवाई..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड तालुक्यात कारवाई करत बटेवाडी येथुन गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करत त्यास बेड्या ठोकल्या आहेत.
स्थागुशा चे पथक जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या बाबत माहिती घेताना दि.04 सप्टेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की संदिप बंडु मरकड (रा.बटेवाडी,ता.जामखेड) हा त्याच्या कब्जामध्ये विनापरवाना गावठीकट्टा व काडतुस बाळगुन जिल्हापरिषद शाळेच्या पाठीमागे बटेवाडी,ता.जामखेड येथे उभा आहे,आता गेल्यास मिळुन येईल.अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने,पोनि/श्री.कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास खात्री करून कारवाई करण्यास सांगितले.पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सदरील ठिकाणी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले, त्यास दोन पंचासमक्ष गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाबत विचारपुस करता त्यांनी लपवुन ठेवलेले 35,000/- रुपये किंमतीचा एक देशी बनावटीचा कट्टा व 1,000/- रुपये किंमतीचे 1 जिवंत काडतुस असा एकुण 36,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल दिला.
ताब्यातील आरोपी याचे विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ/2574 मनोज मोहन साखरे यांच्या फिर्यादीवरुन जामखेड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 497/2025 आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/अनंत सालगुडे, सफौ/रमेश गांगर्डे,पोहेकॉ/हदय घोडके,पोना/शामसुंदर जाधव यांनी केलेली आहे.
