खास नगरकरांसाठी स्पेशल मालवणी फिश थाळीचे आयोजन..तेही वाजवी दरात गुलमोहर रोडवरील हॉटेल मूनलाइट येथे..खवय्यांसाठी एक पर्वणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-आयुष्यात यश मिळवण्यासाठी जिद्द आवश्यक आहेच पण अपयशही कधीकधी आपल्याला अस्वस्थ करतात.पण गुलमोहर रोडवरील हॉटेल मूनलाईटच्या संस्थापकाप्रमाणेच आपल्यामध्ये कष्टाळूपणा आणि विजयाची भूक असली पाहिजे.चांगल्या गोष्टी फक्त एका वळणावर आहेत,या विश्वासाने तुम्ही पुढे जात रहा हे हॉटेलचे संचालक सुमेध गायकवाड आणि त्यांचे दोन्ही बंधू यांच्या उदाहरणावरून असे दिसून येते.

गायकवाड बंधूंचे व्यवसायातील यश हे नक्कीच एखाद्यासाठी प्रेरणादायक आहे.सामाजिक राजकीय लोकांशी ऋणानुबंध असलेल्या गायकवाड परिवाराने हॉटेल मूनलाइट च्या माध्यमातून अहिल्यानगर शहरातील खवय्यांच्या मनात एक घर केले आहे.येथे अनेक प्रकारच्या व्हेज-नॉनव्हेज डिशेसमधील चविष्ट-रुचकर अन्नपदार्थ मिळत असल्याने ग्राहकांना समाधान मिळते.हॉटेलची खासियत म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत संपूर्ण कुटुंब येथे येऊ शकत असल्याने फॅमिली रेस्टॉरंट म्हणूनही या हॉटेलची ओळख निर्माण झाली आहे.येथील अन्नपदार्थ क्वॉलिटी आणि क्वाँटीटीच्या बाबतीत इतर हॉटेलच्या तुलनेत सरस असून ते किफायतशीर दरामध्ये उपलब्ध आहे.येथील व्यवस्थापन आणि स्टाफ शिस्तबद्धपणे ग्राहकांना सेवा देतो, त्यांच्याकडे आपुलकीने लक्ष पुरवतो.तसेच येत्या 7 सप्टेंबर 2025 पासून हॉटेलमध्ये खास स्पेशल मालवणी फीश थाळीचे आयोजन केलेले आहे ते ही फक्त 260 रुपयांमध्ये या थाळीचें वैशिष्ट्य यात बांगडा फ्राय,चिलापी फ्राय,रावस करी,बोंबील चटणी,सुकट चटणी,सॅलड,कोशिंबीर, सोलकढी,रोटी,चपाती, भाकरी (पैकी एक) इंद्रायणी भात असणार आहे.तसेच क्रिकेट प्रेमींसाठी आशिया क्रिकेट स्पर्धेचा मोठ्या स्क्रीनवर आनंदही लुटता येणार आहे. तरी नगर शहरातील खवय्यांसाठी ही मोठी पर्वणी असून लवकरात लवकर गुलमोहर रोड येथील हॉटेल मूनलाईटला एकदा अवश्य भेट द्या असे आवाहन संचालक सुमेध गायकवाड यांनी केले आहे.
