माजी नगरसेविका निर्मलाताई कांबळे यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी गणेश मंडळाची आरती संपन्न
लातूर (प्रतिनिधी):-श्री महालक्ष्मी गणेश मंडळ तुळजापुरे नगर येथे दरवर्षीप्रमाणेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो व तसेच या मंडळामध्ये दहा दिवस विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात.शहर भाजपा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडल अध्यक्षा निर्मलाताई कांबळे यांना या गणपती मंडळामध्ये आरती करण्यासाठी विशेष आमंत्रित केले होते.
यावेळी सौ.निर्मलाताई कांबळे म्हणाल्या की मला गणरायाची सेवा करण्याचे सौभाग्य लाभले आताच मला आनंद आहे.तसेच हे गणेशा सर्वांचं भलं कर,कल्याण कर, रक्षण कर,सर्वांना आनंदी ठेव हि प्रार्थना केली.यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रदीप सलगर, सहसचिव शुभम सोनकांबळे,परीहार टेलर,परिसरातील नागरिक,माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.