घरफोडीतील आरोपी गजाआड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई फरार आरोपींचा शोध सुरू
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोडीतील आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.दि.२२ ऑगस्ट रोजी नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी होऊन त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.किरणकुमार कबाडी यांना गोपनीय माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी विकी संजय काळे (वय ३० वर्षे, रा. भोरवाडी,ता.जि.अहिल्यानगर) याने व त्याच्या साथीदारांनी केला असून,ते चास शिवारात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोनि. कबाडी यानी पथक रवाना केले.नमुद ठिकाणाहून विकी संजय काळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले.चौकशीत त्याने सदरचा गुन्हा स्वतः व इतर साथीदार सुरेश उर्फ पटया आण्णा भोसले (रा. पाटोदा, ता. जामखेड), मंगेश रामदस काळे (रा. सदर, फरार), वैभव उर्फ मुक्या किरण भोसले (रा. धानेरा, ता. आष्टी, जि. बीड, फरार), सुशांत सुरेश भोराले (रा. कामरगांब, ता.जि. अहिल्यानगर, फरार) अशांनी मिळून केल्याचे सांगितले.आरोपी कडून ३१ हजार रुपये किमतीचे सोने व चांदीची दागिने असा मुद्देमाल मिळून आला. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी,सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये, सहायक फौजदार रमेश गांगर्डे, दीपक घाटकर,भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर,बाळासाहेब खेडकर,प्रशांत राठोड,महादेव भांड यांनी केली आहे.
