बेलापुरात पैगंबर जयंती निमित्त गौसे आजम सेवाभावी संस्थेचा शाखा विस्तार
श्रीरामपूर (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील गौसे आजम सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य ही एक सेवाभावी संस्था असून संस्थेने आजपर्यंत विविध सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम राबविलेले आहेत. संस्थेच्या शाखा कार्यकर्ते वाढविण्यासाठी व तिचे सामाजिक,धार्मिक व राजकीय कार्यक्रम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी बेलापूर शाखेचे कार्यकर्ते नेहमीच उत्सुक असतात.त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांची संस्थेवर निवड संस्थेचे संस्थापक अली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सुलतान शेख यांनी केली आहे.
बेलापुर शाखा अध्यक्षपदी अल्कमा शाह, उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, सचिव आदिल शेख,कार्याध्यक्ष समीर शेख,सदस्य शामिद राखी, अरमान काझी,अजीम शेख यांची नुकतीच निवड संस्थेचे अध्यक्ष सुल्तान शेख यांनी केली.तसेच बेलापुरात पैगंबर जयंती निमित्त गौसे आजम सेवाभावी संस्थेचे शाखा विस्तार करण्यात येऊन तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली. यावेळी मार्केट कमिटीचे मा. उपसभापती श्री.अभिषेक खंडागळे याच्या शुभहस्ते शाखेच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले तसेच राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेश सचिव श्री.अरुण पाटील नाईक,संस्थाचे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष सोनूभाई शेख इ. मान्यवर उपस्थित होते.ईद मिलाद निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्लाउद्दीन बाबा चौक,रफीक शाह मित्र मंडल, शेरे हिंद फाउंडेशन यांनी अथक परिश्रम घेतले.