नगर शहरासह तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेची जोरदार कारवाई..पत्त्याचे क्लब बिंगो अवैध दारू विक्रीचे अड्डे उध्वस्त..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका कडून जामखेड तालुक्यातील खर्डा,शेवगांव व अहिल्यानगर शहरामध्ये तिरट, बिंगो जुगार तसेच अवैध दारु विक्रेत्यावर छापे टाकत 43 आरोपींकडुन तब्बल 38 लाख 20,825/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर शहरामध्ये व शेवगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेकामी रवाना केले होते.

अवैध धंद्यावर कारवाई कामी नेमण्यात आलेल्या या पथकाने 1)दि.10 सप्टेंबर 2025 रोजी अहिल्यानगर शहर व शेवगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई कामी नेमण्यात आलेले पथकाने एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे इसम नामे अभिषेक बाळासाहेब खाडे वय 25 वर्षे, रा. लोहगांव, ता. नेवासा,जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन बिंगो नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने,रोख रक्कम असा एकुण 23,270/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्याचेविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गु. र. नं. 700/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच 2)दि.10 सप्टेंबर 2025 रोजी शेवगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये विनापरवाना दारु विक्री करणारा इसम नामे देविदास झुंबर मुसळे वय 51 वर्षे,रा. ढोरजळगांव,ता.शेवगांव याचे विरुध्द कारवाई करुन त्याचे कब्जातुन 49,795/- रुपये किमतीची देशी विदेशी दारु जप्त करुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 811/2025 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

3)शेवगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये विनापरवाना दारु विक्री करणारी महिला नामे उषाताई बाळासाहेब मुसळे रा. ढोरजळगांव,ता.शेवगांव हिचे विरुध्द कारवाई करुन तिचे कब्जातुन 14,160/- रुपये किमतीची देशी विदेशी दारु मिळुन आल्याने तिचे विरुध्द शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 810/2025 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.4)दि.11 सप्टेंबर 2025 रोजी खर्डा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नेमण्यात आलेले पथक अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पोउपनि/समीर अभंग यांना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे लक्ष्मण प्रभु गायकवाड व त्याचे इतर साथीदार असे जातेगांव शिवारातील जातेगांव रोड, निपाणी फाट्याजवळ पत्त्यावर पैसे लावुन तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन खात्री करता सदर ठिकाणी 5 डावांमध्ये काही इसम गोलाकार बसुन पत्त्यावर पैसे लावुन तिरट नावाचा जुगार खेळतांना दिसुन आले. सदर इसमांना जागीच बसण्यास सांगुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्याची नावे 1)बाळासाहेब चांगदेव खाडे वय- 50 वर्षे रा. दिघोळ ता. जामखेड, 2) बाळासाहेब रामचंद्र नेटके वय-63 वर्षे रा. जामखेड ता.जामखेड, 3) संतोष विजयसिंग साळुंके वय- 45 वर्षे रा. खर्डा ता.जामखेड, 4) राजेंद्र मुरलीधर आहेर वय-39 वर्षे रा. डोकेवाडी ता.भुम, जि.धाराशिव 5) रामचंद्र बापुराव राळेभात वय-70 वर्षे रा. जामखेड ता. जामखेड, 6) दादासाहेब पांडुरंग गायकवाड वय-60 वर्षे रा. जातेगांव ता.जामखेड जि. अहिल्यानगर 7) अजय बबन सकट वय-38 वर्षे रा. खर्डा, ता.जामखेड जि. अहिल्यानगर, 8) रविंद्र महादेव भुते वय- वय-36 वर्षे रा. खर्डा ता.जामखेड 9) पवन बबन थोरात वय-37 वर्षे रा. इट ता.भुम जि.धाराशिव 10) दत्तात्रय मुरलीधर घाटे वय- 43 वर्षे रा. नागेवाडी ता. भुम जि. धारशिव 11) नितीन श्रीराम गिते वय-38 वर्षे रा. दिघोळ ता.जामखेड, 12) मारुती छना गिते वय-48 वर्षे रा.दिघोळ ता.जामखेड जि.अहिल्यानगर 13) बापु अनुरथ चव्हाण वय-40 वर्षे रा. पकरुड ता. भुम जि. धारशिव 14) सुनिल नरसिंग काळे वय-34 वर्षे रा. पारगांव घुमरा ता.पाटोदा जि.बीड, 15) विक्रम अरुण शिंदे वय-50 वर्षे रा.दिघोळ ता. जामखेड 16) दादासाहेब महादेव गायकवाड वय-44 वर्षे रा. जातेगांव ता.जामखेड 17) मधुकर नाथोबा बांगर वय – 60 वर्षे रा. बाहेळा ता.पाटोदा, जि.बीड 18) गणेश सुगरीब दौंड वय-39 वर्षे रा.दौंडाचीवाडी ता.जामखेड 19) पंडित किसन दाताळ वय-36 वर्षे रा. वाकी ता.जामखेड 20) चंद्रकांत नागुराव गावडे वय-50 वर्षे रा. पारगांव ता.वाशी, जि. धाराशीव 21) अहमद नुरखा पठाण वय-43 वर्षे रा.बोरखेड ता.जि.बीड, 22) पोपट उत्तम राजगुरु वय-37 वर्षे रा.दिघोळ ता.जामखेड, 23) संतोष दत्तात्रय राऊत वय-52 वर्षे रा. पाटोदा, ता.पाटोदा जि.बीड, 24) संजय बबन भोसले वय-23 वर्षे रा.अमळनेर ता.पाटोदा जि.बीड, 25) भगवान चंद्रकांत गरड वय-34 वर्षे रा.कोष्टीगल्ली भुम ता.भुम जि.धाराशीव 26) गणेश शिवाजी शिंदे वय-48 वर्षे रा. वैद्यकीणी ता. पाटोदा जि.बीड, 27) दत्तात्रय जयसिंग खंडागळे वय-40 वर्षे रा. मात्रेवाडी ता.भुम जि.धाराशिव 28) धनजंय भगवान मोटे वय-40 वर्षे रा. गिरवली ता.भुम जि.धाराशिव, 29) बाजीराव भगवान जाधव वय-52 वर्षे रा.पाटोदा ता.पाटोदा जि.बीड, 30) अशोक उत्तम भोरे वय-35 वर्षे रा.पारगांव ता.वाशी. जि.धाराशिव, 31) शंकर दिगंबर आवारे वय-40 वर्षे रा.माळेवाडी ता. जामखेड 32) धोंडीबा बाबा येळे वय-45 वर्षे रा. मोहरी ता. जामखेड 33) फैय्याज मेहबुब सय्यद वय – 49 वर्षे रा. पाटोदा ता. पाटोदा जि. बीड, 34) लक्ष्मण प्रभु गायकवाड वय-45 वर्ष रा. जातेगांव ता. जामखेड, 35) पोपट नाना खरतोडे वय-60 वर्षे रा.बोडकेवाडी ता.पाटोदा, जि.बीड, 36) सुनिल आश्रुबा बोबडे वय – 45 वर्षे रा.इट.ता.भुम जि. धाराशिव 37) रावसाहेब उत्तम राजगुरु वय-35 वर्षे रा. दिघोळ ता. जामखेड, 38) किरण मुकुंद गोलेकर वय – 42 वर्षे रा. खर्डा ता. जामखेड, 39) अकलाक अहमद शेख वय-31 वर्षे रा. बार्शी नाका, ता. जि. बीड, 40) अशोक रावसाहेब गिते रा. दिघोळ ता. जामखेड असे असल्याचे सांगितले.ताब्यातील इसमांची व तेथे बसलेल्या ठिकाणची झडती घेतली असता त्यांचे कब्जामध्ये रोख रक्कम,तिरट नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणार साहित्य साधने,वाहने,मोबाईल असा एकुण 37,33,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यांचे विरुध्द खर्डा पोलीस स्टेशन गु.र.नं. 147/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी,पोउपनि/समीर अभंग,पोलीस अंमलदार बिरप्पा करमल,शामसुंदर गुजर, मोहन साखरे,अमोल आजबे, प्रकाश मांडगे,राहुल द्वारके, रिचर्ड गायकवाड,सोमनाथ झांबरे,बाळासाहेब नागरगोजे, महादेव भांड,भाग्यश्री भिटे यांनी केलेली आहे.
