स्वामी समर्थ मंदिरात चोरी करणारा ‘थापा’ गजाआड दानपेटी व पाच मोबाईल जप्त..एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नवनागापूर येथील गजानन कॉलनी येथील श्री.स्वामी समर्थ मंदीरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद करत आरोपीं कडुन दानपेटी,पाच मोबाईल व रोख रक्कम असा एकुण ७७,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.दि. २५/०७/२०२५ फिर्यादी सुरेश मगन निकम (वय-५० वर्ष, राहणार-नंदनवन नगर,सावेडी, ता.जि.अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली की,दि. २४/०७/२०२५ रोजी रात्रीचे ०९/०० वा ते दि. २५/०७/२०२५ रोजी सकाळी ०७/०० वा. चे दरम्यान श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र नवनागापुर,वडगाव गुप्ता रोड, अहिल्यानगर येथील मंदीरातील दानपेटी कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे.या मजकुरावरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं. ५८५/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३३१(४), ३०५ प्रमाणे दि.२५/०७/२०२५ रोजी दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि माणिक चौधरी यांना गोपनिय माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा इसम नामे दुर्गाबहादुर खिमप्रसाद थापा,रा. हॉटेल सहयाद्री गजानन कॉलनी, (ता.जि.अहिल्यानगर) याने केला आहे.सदर आरोपीचा तपास पथकातील कर्मचारी यांनी शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार दोन विधीसंर्घषित बालके यांच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली.त्यानंतर विधीसंघर्षित बालके यांचा शोध घेवुन ते मिळुन आल्याने त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हयात चोरी केलेली रोख रक्कम तसेच दानपेटी हि काढुन दिल्याने ती दोन पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करुन गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आली आहे.त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी वेगवेगळया ठिकाणाहून मोबाईल फोन चोरी केलेबाबत कबुली दिल्याने त्यातील एका विधी संघर्षीत बालक याने त्याचे राहते घरातुन ६०,०००/-रु किमतीचे विविध कंपन्यांचे एकुण ५ चोरीचे मोबाईल काढुन दिले असुन ते सदर गुन्हयात जप्त करण्यात आले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक बी.चौधरी प्रभारी अधिकारी, एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन, पोसई मनोज मोंढे,सफौ.राकेश खेडकर,पोहेकॉ राजु सुद्रीक, पोहेकॉ संदीप पवार,पोहेकॉ सचिन आडबल,पोकॉ किशोर जाधव,पोकॉ नवनाथ दहिफळे, पोकों ज्ञानेश्वर आघाव,तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुंडू यांनी केली आहे.
