एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार निलंबित
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शेंडी बायपास या ठिकाणी ट्रक चालकांकडुन अवैधपणे पैसे गोळा करणाऱ्या पोलीस अंमलदारास निलंबित करण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी काढला आहे.दि.०९ सप्टेंबर २०२५ रोजी समाज माध्यमावर एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले.

की सदर व्हिडीओमध्ये शेंडी बायपास परीसरात एक व्यक्ति ट्रक चालकाकडून पैसे घेत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते.चौकशी केली असता हि घटना दि. ०८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे.या घटणेबाबत चौकशी केली असता संबंधित व्यक्ती हा होमगार्ड बाळू जाधव असल्याचे स्पष्ट झाले असून,त्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यामध्ये त्याने मान्य केले की, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई विकास दळवी यांच्या सांगण्यावरुन पैसे जमा केले होते.या गंभीर प्रकरणी पोलीस शिपाई विकास दळवी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असुन,यापूर्वी देखील अशा प्रकारच्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, तसेच समाज माध्यमांवरही सदरबाबतचे व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत.सदर प्रकरणी प्राथमिक चौकशी आदेशित केली आहे.व होमगार्ड बाळू जाधव यांचा कसुरी अहवाल पुढील कार्यवाहीस्तव समादेशक,गृह रक्षक दल,अहिल्यानगर तथा अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचेकडे पाठविण्यात आला आहे.
