अवैध कत्तलखाण्यातील कचरा आणि प्राण्यांचे अवशेष कोठला स्टँड येथील रस्त्यावर आ.संग्राम जगताप आक्रमक रस्ता रोको
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरातील कोठलास्टॅंड येथे झेंडीगेट परिसरातील अवैध कत्तलखाण्यातील कचरा आणि प्राण्यांचे अवशेष आणून टाकले जातात.त्याची प्रचंड दुर्गंधी या भागात पसरते.तेथे गोवंशीय जनावरांची देखील हत्या केली जाते,असाही आरोप आहे.
याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कोठलास्टॅंड येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.यात स्वतः शहराचे आमदार संग्राम जगताप व श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यामध्ये सहभागी झाले आहेत.
