सोन्याच्या दुकानातून चोरी करणाऱ्या कारागीरास थेट पश्चिम बंगाल मधून अटक..71 ग्रॅम सोने हस्तगत..कोतवाली पोलिसांनी असा केला तपास..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- शहरातील गंजबाजार येथील सोन्याच्या दुकानातुन सोने चोरी करणाऱ्या बंगाली कारागीरासह तिघांना कोतवाली पोलीसांनी पश्चिम बंगाल येथून ताब्यात घेऊन या आरोपीकडुन तब्बल 71 ग्रॅम सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.बातमीची हकीकत अशी की,दि.16 ऑगस्ट 2025 रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी रमजान सलाम पियादा (रा. धरती चौक,अहिल्यानगर) हे नमाजकरिता बाहेर गेले असता त्याचा फायदा घेवुन त्यांच्या दुकानातील बंगाली कारागीर अरमान अली कुरबानअली शेख, (रा.उत्तर अभिरामपुर,जिल्हा- हुगली,पश्चिम बंगाल) याने दुकानातील एकुन 93 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे त्यात प्रत्येकी 12 ग्रॅम वजनाचे एकुन 5 सोन्याचे नेकलेस,23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पट्टी गंठण,10 ग्रॅम वजनाच्या एकुन 4 जोड सोन्याच्या पळ्या असे एकुन 4,80,000/- रु किं.चे सोन्याचे दागिणे चोरी केले होते.या गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांनी सपो.नि.तेजश्री थोरात यांचेकडे दिला होता.

गुन्ह्याच्या तपासात तपास अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांच्या मदतीने गुन्ह्यातील प्रमुख आरोपी याचे प्राप्त मोबाईल नंबरचे तांत्रीक विश्लेषन करुन तसेच गोपणीय बातमीदार सतर्क करुन त्यांचे मार्फत माहीती मिळविली. गुन्ह्यातील आरोपी अ.नं.1 अरमान अली शेख याने त्याचे साथीदार नझरुल नुर हुसैन, आसिफ खलील शेख यांचेकडे काही सोन्याचे दागिणे विल्वेवाट लावण्याकरिता दिले तसेच काही दागिणे बस्तरा,कोमलासागर, जिल्हा- हुगली,पश्चिम बंगाल येथील सराफ व्यवसायीक अब्दुलनसीम शेख यास विक्री केल्याचे खात्रीलायक माहीती मिळाली.कोतवाली पोलिसांची टीम गुराप,जिल्हा- हुगली,पश्चिम बंगाल येथे गेली व नमुद चारही आरोपीचा स्थानिक पोलीसांचे मदतीने शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले.पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान गुन्ह्यातील अटक आरोपी अ.नं.1 अरमान अली कुरबानअली शेख,वय 20 वर्षे, रा.बस्तरा, उत्तर अभिरामपुर, जोयकुल,जिल्हा- हुगली, पश्चिम बंगाल,अ.नं.2 नझरुल नूर हुसैन, वय 23 वर्षे,रा.खोला डांगा पारा, जोलकुल,जिल्हा- हुगली,पश्चिम बंगाल राज्य.अ.नं. 3 आसिफ खलील शेख,वय 20 वर्षे,रा. उत्तर अभिरामपुर, जिल्हा- हुगली पश्चिम बंगाल राज्य, अ.नं. 4 अब्दुलनसीम अब्दुलवहाब शेख, वय 41 वर्षे, रा. मुडा गाछी, अबुझाटी, जिल्हा- बर्धमान, पश्चिम बंगाल राज्य यांचेकडे त्यांना विश्वासात घेवुन तपास केला असता अटक आरोपी अ.नं. 2 ते 3 यांनी गुन्ह्याबाबत उपयुक्त माहीती देवुन त्यांचे ताब्यातील सोने त्यांचे घरी असल्याचे सांगितले. आरोपी यांचे घरी संपर्क करुन माहीती घेतली असता आरोपींचे नातेवाईक यांनी त्यांचे घरात मिळुन आलेले आरोपी अ.नं. 1 याने चोरी केलेले एकुन दागिण्यापैकी जे दागिणे त्यांचे घरी होते ते साक्षीदार गोविंद दास,गुराप,पश्चिम बंगाल यांचेकडे जमा केले.त्यांचेकडुन साक्षीदार समशेरअली इम्रानअली शेख,रा.धरती चौक, अहिल्यानगर यांनी पश्चिम बंगाल येथे जावुन गुन्ह्यातील चोरीचे दागिण्यापैकी आरोपी अ.नं. 2,3,4 यांचे नातेवाईक यांनी हजर केलेले दागिणे ताब्यात घेवुन दि.16 सप्टेंबर 2025 रोजी गुन्ह्याचे तपासात पंचासमक्ष तपास अधिकारी यांचेकडे हजर केले.तपास अधिकारी यांनी ते पंचासमक्ष रीतसर जप्ती पंचनामा करुन ताब्यात घेतले असुन त्याचे वर्णन, 1)1,80,000/- रु कि. चे एकुन तीन पिवळ्या धातुचे (सोन्याचे) नेकलेस प्रत्येकी वजन 12 ग्रॅम या प्रमाणे एकुन वजन 36 ग्रॅम असे असलेले जु.वा.किं.अं. 2)1,30,000/-रु किं.चे एक पिवळ्या धातुची सोन्याचे पट्टी व काळे मनी असलेले गळ्यातील गंठन पळ्या नसलेले जु.वा.कि.अं. 3) 60,000/- रु किं.चा एक पिवळ्या धातुचा (सोन्याचा) नेकलेस वजन 12 ग्रॅम असलेले जु.वा.किं.अं. असे एकुन 3,70,000/- रु किंमतीचे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आले आहे.चोरीस गेला एकुन मुद्देमाल 93 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे पैकी 71 ग्रॅम सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आले असुन उर्वरीत मुद्देमालाबाबत आरोपी अ.नं.1 यांचेकडुन माहीती प्राप्त करुन ते जप्त करण्याची तजवीज ठेवली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री.शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,सहा. पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, पोउपनिरीक्षक गणेश देशमुख, पो.हे.कॉ.बाळकृष्ण दौंड,विनोद बोरगे,सलीम शेख,विशाल दळवी,सुर्यकांत डाके,विक्रम वाघमारे,संदिप पितळे,पो.कॉ. सत्यजित शिंदे,अमोल गाडे, अतुल काजळे,महेश पवार, अतुल कोतकर,शिरीष तरटे, दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो.कॉ.राहुल गुंडु यांनी केली आहे.
