जिल्ह्यात विविध मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीस एलसीबीने ठोकल्या बेड्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हयातील 08 मंदिरात चोरी केलेल्या गुन्हयातील आरोपींच्या टोळीस जेरबंद केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार यांचे विशेष पथके बनवुन अहिल्यानगर जिल्हयातील मंदिर चोरी गुन्हे उघडकी विशेष मोहिम राबविणेबाबत आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने विशेष पथकाने जिल्हयातील मंदिर चोरी संदर्भात विविध गुन्हयाची माहिती घेतली असता,नगर तालुका पो.ठाणे येथे दाखल प.ना.कॉ.रजिस्टर नंबर 767/ 2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे दाखल अदखलपात्र गुन्हयातील आरोपीबाबत गुप्त बातमीदारामार्फत तसेच व्यावसायिक व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपी नामे दिपक कचरे,रा.लोहगाव,ता. राहाता,जि.अहिल्यानगर हा भुईकोट किल्ला मैदान भिंगार येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता,पोनि किरणकुमार कबाडी यांना माहिती देवुन,त्यांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचुन, गुप्त माहितीप्रमाणे इसम ताब्यात घेऊन,चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नांव दिपक रावसाहेब कचरे, वय- 24 वर्षे, असे सांगितले असता, त्यांचे सोबत अजुन दोन इसम यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नांवे किरण बाळासाहेब राऊत,वय- 20 वर्षे,अजय उर्फ लाल्या वसंत बनसोडे,वय- 18 वर्षे,सर्व राहाणार नेहरुनगर, लोहगाव,ता.राहाता, जि. अहिल्यानगर असे सांगितले, अधिक चौकशी केली असता, त्यांनी तीघांनी मिळुन नगर तालुका पो.ठाणे हद्दीत दाखल प.ना.कॉ. रजिस्टर नंबर 767/ 2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली देवुन, दानपेटीतील 71,000/- रुपये वाटुन घेतले बाबत माहिती दिली. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचे कडुन एकुण 32,060/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपी दिपक रावसाहेब कचरे याला विश्वासात घेऊन, अशा प्रकारे आणखी गुन्हे केलेबाबत विचारपुस केली असता तीघांनी मिळुन अहिल्यानगर जिल्हयात विविध ठिकाणी गुन्हे केल्याची माहिती दिली.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/ राहुल व्दारके,पोहेकॉ/लक्ष्मण खोकले,पोहेकॉ/फुरकान शेख, पोहेकॉ/दिपक घाटकर,पोना/ रिचर्ड गायकवाड,पोना/ भिमराज खर्से,पोकॉ/रमीजराज आतार,पोकॉ/सुनिल मालणकर यांनी केलेली आहे.
