जळकोट ते अणदूर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे..तात्काळ महामार्ग दुरुस्त करा अन्यथा अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही..तो पर्यंत टोल वसुली बंद ठेवा-प्रशांत नवगिरे
नळदुर्ग प्रतिनिधी (अजित चव्हाण):-जळकोट ते अणदूर दरम्यान (सोलापूर ते हैद्राबाद) राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड मोठे खड्डे पडले असून महामार्गावर पाणीच पाणी साचले आहे.हायवेच्या अधिकाऱ्यांचा गलथान कारभार, जाणीवपूर्वक दुर्लक्ष आणि निकृष्ठ काम ! यामुळेच अणदूर च्या चिवरी पाटी येथील नागरीकांच्या जवळपास पंधरा ते वीस घरात पावसाचे पाणी घुसले आहे. जळकोट जवळील अलियाबाद शिवारातील मुर्टा पाटी जवळील हायवेवर, गुडघ्या इतके पाणी थांबले असून हायवेला नाल्याचे स्वरूप आले आहे. या सर्व परिस्थितीस जबाबदार असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना, ही सर्व कामे तात्काळ करून महामार्ग पूर्ववत सुरू करावा, पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाय योजना कराव्यात, तातडीने महामार्गावरील सर्व मोठेमोठे खड्डेही बुजवावेत अन्यतः महामार्ग प्राधिरणच्या एकाही अधिकाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. असा सज्जड इशारा शिवसेना (उबाठा) पक्षाचे तथा जळकोटचे उपसरपंच प्रशांत नवगिरे यांनी हायवेच्या उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. तसेच महामार्ग पूर्ण सुरळीत होऊन सुस्थितीत होणार तोपर्यंत, टोल वसुली बंद ठेवा. अन्यतः संपूर्ण टोलनाकाच उध्वस्त करू ! असा इशाराही दिला.

यावेळी शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे तालुका संघटक कृष्णात मोरे, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव (मेजर), नळदुर्ग शहरप्रमुख संतोश पुदाले, जळकोट विभागाध्यक्ष अनिल छत्रे, युवा सेना नळदुर्ग शहरप्रमुख नेताजी महाबोले, होर्टी शाखाप्रमुख दत्ता भोसले, आलियाबाद शाखा प्रमुख नितीन राठोड, सरपंच सुर्यकांत चव्हाण, उद्योजक धनंजय बिराजदार आदी उपस्थित होते.
