राज्य सरकार बंजारा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेईल-पालकमंत्री प्रतापराव सरनाईक
तुळजापूर प्रतिनिधी (अजित चव्हाण):-बंजारा समाजास हैदराबाद गॅजेट महसूल रेकॉर्ड नोंदीनुसार अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं या मागणीचे निवेदन धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी स्वीकारले असून बंजारा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवणार राज्य सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेईल असे त्यांनी आश्वासन दिले.
धाराशिव जिल्ह्यातील सकल बंजारा समाज तुळजापुरात हजारोच्या संख्येने आक्रमक होऊन भव्यशक्ती प्रदर्शन करीत एकवटले होते. एकच गोर लाखेरो जोर, जय सेवालाल महाराज असा नारा देत बंजारा समाज रस्त्यावर उतरले होते. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांना निवेदन देण्यासाठी तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रोडवर सकल बंजारा समाज ठिय्या मांडून बसले होते. सरकारने आमच्या मागण्याचे विचार न केल्यास आगामी काळात जिल्ह्यात रस्त्यावर उतरून भव्य मोर्चा काढण्यात येणार असा इशारा सकल बंजारा बांधवांनी दिला आहे. मायबाप सरकार आमच्या भावना लक्षात घेऊन समिती गठीत करून बंजारा समाजास एसटी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी केली आहे. पालकमंत्री सरनाईक यांनी बंजारा समाजाची भेट घेतली. बंजारा समाजाच्या समस्या जाणून घेतली. यावेळी धाराशिव जिल्हा सकल बंजारा बांधवांच्या वतीने बंजारा महिलांनी पालकमंत्री सरनाईक यांना निवेदन दिले.
याप्रसंगी जिल्हापरिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, हरीश जाधव, गोरसिकवाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष आर.सी.चव्हाण, दिलीप जाधव, राजू चव्हाण, बंजारा क्रांती दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष विद्यानंद राठोड, बंजारा तांडा समृद्धी योजनेचे विभागीय सदस्य प्रवीण पवार, अॅड. राज राठोड, लक्ष्मण चव्हाण, प्राचार्य संतोष चव्हाण, सरपंच लक्ष्मण राठोड, वसंत पवार, दामाजी राठोड, डॉ.सुरेश चव्हाण, माजी नगरसेवक निरंजन राठोड, वैभव जाधव, शशिकांत राठोड, शेषराव राठोड, सचिन जाधव, संजय राठोड, जगन्नाथ चव्हाण, लालसिंग राठोड, डी.यु.राठोड दत्ता राठोड, दिनेश राठोड, कुमार राठोड, गोविंद राठोड, पत्रकार शिवाजी नाईक, बालाजी राठोड, शिवाजी राठोड, शिवाजी चव्हाण, संतोष चव्हाण, सुरेश चव्हाण सुरेश राठोड, गुरुनाथ राठोड, शेषेराव चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, सेवानिवृत्त अन्न भेसळ अधिकारी शंकर राठोड, उपसरपंच अमृता चव्हाण, माजी नगराध्यक्षा झिमाबाई राठोड, माजी नगरसेवक छमाबाई राठोड, माजी सरपंच ज्योतीका चव्हाण, रेखा चव्हाण, उपसरपंच रवीना राठोड यांच्यासह महिला पुरुष बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
